महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ मे ।। Mark Wood Bouncer Video: विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघ इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेतील चौथा सामना गुरुवारी खेळवण्यात आला. ज्यामध्ये पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजीला आला होता. ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडचा भेदक गोलंदाज मार्क वूडने पाकिस्तानचा फलंदाज आझम खानला बाऊन्सरवर विचित्र पध्दतीने बाद केले,ज्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाकिस्तानच्या डावातील ११व्या षटकात हा प्रकार घडला. शादाब खान गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर आझम खान फलंदाजीसाठी उतरला होता. चार चेंडू खेळले असूनही त्याला एकही धाव घेता आली नव्हती. मार्क वुडने त्याच्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर भयंकर बाऊन्सर टाकला. या चेंडूवर आझम खानने डोळे बंद करत बॅट वर करतो पण तो यष्टीरक्षकाकडून झेलबाद झाला. या चेंडूचा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. वुडच्या या शॉर्ट पिच चेंडूचा वेग इतका आहे की, आझम खान स्वत:ला वाचवू शकेल तोपर्यंत चेंडू त्याच्या ग्लोव्हजला लागला होता.
Absolute savagery from Mark Wood ????#EnglandCricket | #ENGvPAK pic.twitter.com/zrrksjNF95
— England Cricket (@englandcricket) May 30, 2024