“पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारीवर्गासाठी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी योग्य योजना असावी ” – आमदार अण्णा बनसोडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड – मनपा कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य खर्च प्रतिपूर्ती म्हणून धनवंतरी योजना अस्तित्वात होती परंतू मनपाने विमा एजंट कंपनी मार्फत गट विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी निविदा काढली आणि त्या प्रमाणे के. एम. दस्तूर या विमा एजंट कंपनी मार्फत न्यू इंडिया इन्शुरन्स या विमा कंपनीची ३१ कोटी रुपये खर्च करून पॉलिसी खरेदी करण्यात येणार आहे. परंतू मनपा कामगार महासंघाचा यास विरोध असून धन्वंतरी योजना सुरु ठेवावी अशी मागणी महासंघाने केली होती. त्याअनुषंगाने Covid – 19 साथ नियंत्रणात येई पर्यंत विमा पॉलिसी खरेदी करण्यात येऊ नये व धन्वंतरी योजना कायम ठेवण्यात यावी. विमा एजंट कंपनीच्या फायद्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून विमा पॉलिसी रक्कम व धन्वंतरी योजनेतून होणारा खर्च यात मोठी तफावत असल्याने मनपाचे नुकसान होताना दिसत असल्याने तसेच विमा कंपनी अनेक विकार/आजार स्विकारत नसल्याने कर्मचारी वर्गास या पॉलिसी संपूर्ण लाभ होणार नसल्याचे कामगार संघाचे मत आहे. विमा पॉलिसी घेण्या पूर्वी विमा पॉलिसी व धन्वंतरी योजना यांच्यामधील फरक तुलनात्मक तक्त्यासह PPT प्रेझेन्टेशन द्वारे दाखविण्यात यावे व कोणत्याही निर्णया पूर्वी ज्या घटकासाठी ही योजना आहे त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मनपा कर्मचारी महासंघासही विश्वासात घेण्यात येऊन होणाऱ्या निर्णयास कर्मचारी महासंघाची मान्यता असावी. अशा आशयाचे पत्र दि. ४ जून रोजी आमदार बनसोडे यांनी मनपा आयुक्त यांना दिले होते,

त्या अनुषंगाने आयुक्त हर्डीकर यांच्या दालनात नुकतीच बैठक पार पडली या बैठकीत विमा एजंट कंपनीच्या प्रतिनिधि मार्फत प्रेझेंटेशन देण्यात आले. पॉलिसी घेणे कसे फायदेशीर आहे हे पटवून देण्याच्या प्रयत्न विमा एजन्सीकडून करण्यात आला. तर पॉलिसी घेतल्याने कर्मचारी वर्गास अशी अडचण होईल हे सांगण्याचा प्रयत्न महासंघाच्या प्रतिनिधींनी केला. एकंदरीत धन्वंतरी योजना सुरु ठेवण्यासाठी महासंघ आग्रही असल्याचे दिसून आले तर एजंट विमा कंपनीच्या प्रतिनिधीनेही प्रस्तावनेत धन्वंतरी योजना चांगली असल्याचा उल्लेख करून पॉलिसी उपयुक्त असल्याची माहिती दिली. तर पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारीवर्गासाठी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी योग्य योग्य योजना आमलात आणावी असे बनसोडे यांनी सांगितले. ७५०० मनपा कर्मचारी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी ३०० रुपये वर्गणी देतात तर निवृत्त १५० कर्मचारी १५० रु. वर्गणी भरत असून मनपा दुप्पट ६०० रुपये हिस्सा भरते. कर्मचारी वर्गणी व मनपा हिस्सा मिळून अंदाजे १० कोटी रुपये जमा होतात तर धनवंतरी योजनेवर सरासरी मनपाने १७ कोटी रुपये खर्च केलेला असून दुप्पट खर्च करून मनपाने विमा पॉलिसी खरेदी न करता सुधारीत धन्वंतरी योजना आणावी अशी महासंघाची मागणी असल्याचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. बैठकीस आमदार बनसोडे व आयुक्त हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्यासह कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे व सदस्य सुरेश गारगोटे, अविनाश ढमाले, बाळासाहेब कापसे, सुप्रिया सुरगुडे, योगेश रसाळ, योगेश वंजारी व विमा एजंट कंपनी मार्फत देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *