Punjab Train Accident: दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक! ट्रेन चालक गंभीर जखमी, प्रवासी गाडीही अडकली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जुन ।। पंजाबमधील फतेहगढ साहिबमधील सरहिंदमधील माधोपूरजवळ पहाटे मोठी दुर्घटना टळली. रेल्वेच्या दोन मालगाड्यांची मोठी धडक झाली. या धडकेत दोन रेल्वे चालक जखमी झाले. जखमींना श्री फतेहगड साहिब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटल फतेहगढ साहिब येथून राजिंदर हॉस्पिटल पटियाला येथे पाठवण्यात आले आहे.


स्थानिक माध्यामांनी दिलेल्या वृत्तानुसार, सरहिंद रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माधोपूर चौकीजवळ रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास मालगाडीचा अपघात झाला. येथे दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मालगाडीचे इंजिन उलटले आणि एक प्रवासी गाडीही त्यात अडकली.

या अपघातात दोन लोको पायलट जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या लोको पायलटची नावे सहारनपूर येथील 37 वर्षीय विकास कुमार आणि 31 वर्षीय हिमांशू कुमार अशी आहेत. त्यांना 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *