Health: या लोकांनी चुकूनही खाऊ नये मखाणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जुन ।। मखाणामध्ये अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी बॅक्टेरियल, कॅल्शियम, मॅग्नेशियमसोबतच प्रोटीन भरपूर प्रमाणा असते. मखाणामध्ये कॅलरीजचे प्रमाण फार कमी असते. यामुळे वेट लॉसदरम्यान तुम्ही डाएटमध्ये सामील करू शकता. आरोग्यासाठी इतके फायदेशीर असतानाही काही लोकांनी मात्र याचे सेवन करू नये.

गॅसचा त्रास
मखाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण असते यामुळे हा पचण्यास थोडा वेळ घेतो. अशा स्थितीत तुम्हाला जर गॅसेसचा त्रास असेल तर तुम्ही मखाणा खाऊ नये.

किडनी स्टोन
जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर मखाणापासून दूर रहावे. मखाणामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते.

सर्दी, ताप
जर तुम्हाला सामान्य सर्दी, ताप असेल तर मखाणा अजिबात खाऊ नये.

अॅलर्जी असल्यास
ज्यांना अॅलर्जीचा त्रास आहे अशा लोकांनी चुकूनही मखाण्याचे सेवन करू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *