महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ जून ।। दररोज सायकल चालवल्याने तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी घटते. त्यामुळं वजनही नियंत्रणात राहते. त्यामुळं तुमच्या दिवसाची सुरुवात ही सायकल चालवण्यापासून करण्यास काहीच हरकत नाहीये. नियमितपणे सायकल चालवल्यास शरीर तंदुरुस्त राहते. त्याचबरोबर खांदे व पायाचे स्नायू मजबूत होतात.
दररोज सायकल चालवल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची लेव्हल नियंत्रणात येते. त्यामुळं हृदयाचे आरोग्य सुधारते व हृदय विकाराचा धोका कमी होतो.
सायकल चालवल्यामुळं ताण-तणाव, नैराश्य यातून सुटका होते. मानसिक आरोग्य सुधारे. आपल्या शरीरातील हॅपी हार्मोन्स बाहेर पडतात आणि मूड सुधारण्यास मदत होते. तसंच, सायकल चालवल्यामुळं चांगली झोपदेखील येते.
नियमीत सायकल चालवल्यामुळं रक्तप्रवाह सुधारतो. रोज सकाळी सायकल चालवणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
दररोज सायकल चालवल्यामुळं पायाचे स्नायू मजबूत होतात. तसंच, तुमच्या पायाच्या सांध्यांवर दबाव पडत नाही त्यामुळं पायही बळकट होतात
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे..)