Pune Accident News: आगरवाल परिवाराची आणखी एक पळवाट बंद ; पोर्शे कारमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचे स्पष्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ जून ।। पुणे : पुणे पोर्शे कार (Pune Porsche Accident) अपघाताचे पुरावे गोळा करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. अपघात झालेल्या गाडी मध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता, पोर्शे (Porsche) कंपनीने केलेल्या अधिकृत तपासणीच्या अहवालातून माहिती स्पष्ट झाली आहे. कंपनीकडून या संदर्भातील अधिकृत अहवाल पोलिसांना सुपूर्द करण्यात आला आहे. बिल्डरपुत्राने ठोकलेल्या पोर्शे गाडीची तपासणीसाठी पोर्शे कंपनीची टीम पुण्यात दाखल झाली होती. पोर्शे कंपनीच्या प्रतिनिधींनी गाडीची तपासणी केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडलं. एकीकडे अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न होत होते. पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल यांच्या वकिलांकडून गाडीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं आरोप करण्यात येत होता. त्यानंतर पोलिसांनी थेट पोर्शे कार कंपनीच्या अधिकृत पथकाला बोलावले आणि त्यांच्याकडून गाडीची तपासणी करण्यात आली. पोर्शे कार कंपनीच्या मुंबई सेंटरहून प्रतिनिधी आले होते. त्यानंतर त्यांनी गाडीमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड नसल्याचा अहवाल दिला. त्यामुळे मुलाला वाचवण्यासाठी वकिलांनी काढलेली आणखी एक पळवाट बंद झाली आहे.

पोर्श गाडीमधील सीसीटिव्ही तपासण्यात आला
पोर्श गाडीमधील लावण्यात आलेला सीसीटिव्ही सुद्धा तपासण्यात आला. काही दिवसांपूर्वी कंपनीच्या प्रतिनिधींनी येरवडा पोलीस ठाण्यात जाऊन गाडीची तपासणी केली होती . गाडीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची तक्रार अल्पवयीन तरुणाच्या कुटुंबीयांनी केली होती. ही गाडी ऑटोमॅटीक आहे. तपासणीनंतर आम्ही याबाबत अधिक माहिती देऊ शकू, अशी प्रतिनिधींनी प्रतिक्रिया दिली आहे.

अग्रवाल कुटुंबच आरोपीच्या पिंजऱ्यात
पोर्शे कार अपघात प्रकऱणी अग्रवाल कुटुंबच आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. आरोपी अल्पवयीन मुलगा, वडील, आई आणि आजोबा अटकेत आहेत. अल्पवयीन मुलगा सध्या बालसुधारगृहात आहे. त्याला पाच जूनपर्यंत सुधारगृहात ठेवण्याचा आदेश देण्यात आलाय. गुन्हात मुलागेच वडील, आई आणि आजोबा अटकेत आहेत. अपघातानंतर चालकाच्या अपहरणाचा कट केल्याप्रकरणी विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक कऱण्यात आली आहे. दोघांनाही न्यायालयीन कोठडी आहे. शिवानी अग्रवाल यांना पाच जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *