महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुन ।। छत्रपती संभाजीनगर कोण विजय मिळवणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. औरंगाबादच्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वेगळा निकाल लागलेल्या मतदारसंघात यंदा होणाऱ्या बहुरंगी लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते. महायुती, महाविकास आघाडी, एमआयएम, वंचितसह अपक्षांच्या या चुरशीच्या लढतीत कोण कोणाच्या मदतीला येणार, यापेक्षा कोण कुणाची डोकेदुखी ठरणार याची चर्चा रंगली होती.
इम्तियाज जलील 35691, संदिपान भुमरे 33419, चंद्रकांत खैरे 22243, इम्तियाज जलील 2272 मतांनी पुढे ( लीड घटली )
इम्तियाज जलील (एमआयएम) १३ हजार मतांनी आघाडीवर, चंद्रकांत खैरे (ठाकरे गट), संदिपान भुमरे (शिंदे गट) पिछाडीवर
चंद्रकांत खैरे (ठाकरे गट) आघाडीवर, संदिपान भुमरे (शिंदे गट), इम्तियाज जलील (एमआयएम) पिछाडीवर
महायुतीकडून पालकमंत्री संदीपान भुमरे यांना शिवसेनेने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते, तर महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले. एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढत होत्या. ‘एमआयएम’ने विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली; तर ‘वंचित’ कडून महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अफसर खान आपले नशीब आजमावत होते. माजी आमदार हर्षवर्धन जाधव निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. २०१९च्या निवडणुकीत जाधव तिसऱ्या क्रमांकावर होते. याशिवाय डॉ. जीवनसिंह राजपूत, जे. के. जाधव यांच्यासह एकूण ३७ उमेदवार होते.
