महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुन ।। लोकसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून दुपारी १.३० वाजेपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार भाजपने एका जागेवर विजय आणि २४० जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस पक्ष ९६ जागांवर आघाडीवर आहे. समाजवादी पक्ष ३६ जागांवर तर तृणमूल काँग्रेस ३१ जागांवर आघाडीवर आहे. त्या पाठोपाठ डीएमके २१ तर डीटीपी १६ जागांवर आघाडीवर आहे. हा ट्रेंड असला तरी साधारण वरील नंबरमध्ये फार मोठा फरक पडण्याची शक्यता कमी आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपने ३७० जागांचे टार्गेट ठेवले होते. तर एनडीए आघाडीला ४००च्या पुढे जागा मिळतील असा दावा करण्यात आला होता. सध्याच्या ट्रेंड नुसार भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल का याबाबत शंका वाटत आहे. लोकसभेच्या ५४३ जागांपैकी बहुमतासाठी २७२ जागांची आवश्यकता असते. अशात सध्या भाजपच्या जागा पाहता त्यांना स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी अजून ३१ जागांची गरज लागणार आहे. तसेच झाले नाही तर मित्र पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागेल. विशेष म्हणजे २०१४ साली जेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मोदींनी जेव्हा पराभव केला होता तेव्हा भाजपलने स्वबळावर 282 जागा जिंकल्या होत्या. म्हणजे बहुमतापेक्षा त्यांच्याकडे १० जागा जास्त होत्या. २०१९ मध्ये भाजपने ३०३ जागा जिंकत नवा विक्रम केला होता. आता २०२४ मध्ये भाजपला मोठा सेट बॅक बसल्याचे दिसते.
