महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – सराफा बाजारात शनिवारी सोने १६० रुपयांनी स्वस्त झाले. आज मुंबईत सोन्याचा भाव प्रती दहा ग्रॅम ४७९०० रुपये झाला. शुक्रवारी तो ४८०६० रुपये होता. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत. चांदीचा भाव प्रती किलो ४७७०० रुपये आहे.
Good Returns या वेबसाईटनुसार दिल्लीत आज २२ कॅरेटचा भाव ४६७०० रुपयांवर कायम आहे. मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७२५० रुपये आहे. तर चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४६१८० रुपये भाव आहे. चेन्नईत सर्वात आधी सोन्याचा भाव ५० हजार रुपयांवर गेला आहे. आज चेन्नईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०३९० रुपये झाला आहे. शुक्रवारी सोन्याच्या किमतीत २९० रुपयांची घसरण झाली होती. जाणकारांच्या मते , आफ्रिका आणि अमेरिकेतील सोन्याच्या खाणींमधील उत्खननाला करोना व्हायरसचा फटका बसला आहे. लॉकडाउन आणि कामगारांची वानवा यामुळे सोने उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमॉडिटी बाजारात सोने तेजीत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे
.
