वीज गायब झाली तर ‘माय बेस्ट’वर करा तक्रार; व्हॉट्सअॅप, मोबाईल नंबरसह 24 बाय 7 सेवा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जुन ।। आता माय बेस्ट या अॅपवर आपल्याला तक्रार दाखल करता येणार आहे. शिवाय व्हॉट्सअॅप आणि मोबाईल नंबरची सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांच्या सेवेसाठी प्रशासनाने जादा कर्मचाऱयांची कुमकही उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ग्राहकांना 24 बाय 7 अशा वेळेत प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध राहणार आहेत.

पावसाळय़ात ठिकठिकाणी पाणी तुंबणे, वाहतूक काsंडीची समस्या यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता अधिक असते. तसेच पाणी तुंबलेल्या ठिकाणी शॉक लागण्याचा धोका असतो. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रम सज्ज झाला असून नियंत्रण कक्ष 24 बाय 7 कार्यरत असणार आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी वीज ग्राहकांनी त्यांचा वीजग्राहक क्रमांक अथवा वीज मापक क्रमांक नोंदवावा. फ्युज पंट्रोल दूरध्वनी क्रमांक वीज देयकावर छापलेले असतात. वीजग्राहक क्रमांक विद्युत देयकाच्या अगदी वरील बाजूस उजव्या कोपऱयात छापलेला असतो. तसेच वीज मापक क्रमांक हा विद्युत देयकाच्या मागील बाजूस, मध्यभागी असलेल्या टेबलच्या पहिल्या रकाण्यात दर्शविण्यात येतो. या दोनपैकी एक क्रमांक तक्रार नोंदविताना आपल्या जवळ असणे अपेक्षित आहे. वीज ग्राहक त्यांच्या वीज पुरवठाबाबतच्या तक्रारी MiBest’ या अॅपवर नोंदवू शकतात. हे अॅप मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरून डाऊनलोड करु शकतात.

पावसाळय़ात अशी घ्या काळजी
परवानाधारक विद्युत ठेकेदाराकडून आल्या वीजमापकांच्या केबिनपासून घरापर्यंतचे वायरिंग तसेच घरातील विद्युत उपकरणांचे वायरिंग व विद्युत संचमांडणी तपासून घ्या. तसेच आपल्या संचमांडणीमध्ये योग्य रेटिंगच्या ईएलसीबीचा वापर करा.

अतिवृष्टीच्यावेळी किंवा वीजमापक केबिनमध्ये पाणी गळू लागल्यास किंवा पाणी शिरले असता, आपल्या घरातील विजेचे मुख्य स्वीच बंद करा. परवानाधारक विद्युत पंत्राटदाराने अथवा बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱयाने सुरक्षिततेची खात्री दिल्यानंतरच वीज पुरवठा सुरू करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *