महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जुन ।। लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आज एनडीएचे खासदार सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. याआधी सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला एनडीएचे सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत.
#WATCH | Delhi: Uttar Pradesh CM Yogi Adityanath arrives for the NDA Parliamentary party meeting. pic.twitter.com/gGMEWrxdZE
— ANI (@ANI) June 7, 2024
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार बनवण्यासाठीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. एनडीएच्या घटक पक्षांची आज एक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत एनडीएचे सर्व खासदार सहभागी होणार आहेत. एनडीएच्या या खासदारांची बैठक आज सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत एनडीएचे नेते आणि खासदार उपस्थित राहतील. या शिवाय भाजपशासीत राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.