लोणावळ्याला फिरायला जाताय? तर थांबा! पुणे लोणावळादरम्यान मेगा ब्लॉक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ जुन ।। आज सुट्टी आणि पाऊस बघून जर तुम्ही पुणे-लोणावळ्यादरम्यान (Pune – Lonavala Mega Block) ट्रेनने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी.. कारण पुणे-लोणावळ्यादरम्यान आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या देखभाल सुरक्षिततेसाठी ही ब्लॉक घेण्यात येणार आहे. कामशेत-तळेगाव दरम्यान असलेल्या पुलावर लोखंडी गर्डरच्या ठिकाणी एकूण 6 आरसीसी सेगमेंटल बॉक्स बसवण्यात येणार आहे. त्यामुळे लोणावळा ते पुणे लोकल, लोणावळा-शिवाजीनगर,शिवाजी नगर-तळेगाव,तळेगाव-पुणे या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच चार एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्यात. त्यामुळे प्रवाशांनी यासंदर्भातली नोंद घ्यावी असं देखील रेल्वेकडून सांगण्यात आलंय.

पुणे लोणावळ्यादरम्यान आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या देखभाल सुरक्षिततेसाठी तसेच अभियांत्रिकी कार्यासाठी हे मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. कामशेत-तळेगाव दरम्यान असलेल्या पुलावर लोखंडी गर्डरच्या ठिकाणी एकूण 6 आरसीसी सेगमेंटल बॉक्स बसवण्याच्या कामासाठी आज मेगा ब्लॉक घेणार आहे.

ब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द
लोणावळा-पुणे लोकल गाडी क्र. 01561
लोणावळा-शिवाजीनगर-गाडी क्र.01563
पुणे-लोणावळा गाडी क्र . ⁠01566
शिवाजी नगर-तळेगाव गाडी क्र. 01588
तळेगाव-पुणे गाडी क्र. 01589
त्याचबरोबर एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस
पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस
मुंबई-पुणे डेक्कन क्विन सुपरफास्ट एक्स्प्रेस
पुणे-मुंबई डेक्कन क्विन सुपरफास्ट एक्स्प्रेस
या चार एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

राज्यात मान्सून दाखल
राज्यात मान्सून दाखल झाला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, पुणे, कोकण, विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारी मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस झाला. तर पुणे शहरात देखील ढगफुटी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. राज्यातील इतर भागात देखील येत्या 2 दिवसात वरुणराजाचे जोरदार आगमन होणार आहे. याबाबत इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील 48 तासांत मान्सून मुंबईत दाखल होणार आहे. सिंधुदुर्गाला आज रेड अलर्ट देण्यात आलाय. तर संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आलाय. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट, ज्यात १०० मिमीहून अधिक पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो. सिंधुदुर्गासाठी आज रेड अलर्ट, काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *