छोटी गुंतवणूक पण प्रत्येक महिन्याला मिळणार 1 लाख रुपये पेन्शन, जाणून घ्या ‘हा’ नवा फॉर्म्यूला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जुन ।। निवृत्तीनंतर आर्थिक चणचण भासू नये यासाठी अनेकजण वेगवेगळ्या मार्गाने गुंतवणूक करतात. गुंतवलेले हेच पैसे निवृत्तीनंतर वापरले जातात. पण एनपीएस योजनेच्या (NPS) माध्यमातून तुम्हाला चांगली पेन्शन मिळवता येते. योग्य पद्धतीने गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्रतिमहिना एक लाख रुपये मिळू शकतात. हे कसे शक्य आहे, ते जाणून घेऊ या…

एनपीएस योजना काय आहे? (What Is NPS)
निवृत्तीनंतर प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम मिळावी आणि कोणतीही आर्थिक चणचण भासू नये यासाठी NPS ही योजना चालू करण्यात आलेली आहे. या योजनेत चक्रिवाढ व्याजाचा फायदा मिळतो. याच कारणामुळे या योजनेत दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगले पेन्शन मिळू शकते.

एक लाख रुपये पेन्शन कशी मिळणार?
निवृत्तीनंतर तुम्हाला प्रतिमहिन्याला एक लाख रुपये पेन्शन हवी असेल तर शक्य तितक्या लवकर या योजनेत गुंतवणूक करणे चालू करावे लागेल. समजा तुमचे वय 18 वर्षे आहे आणि याच वयापासून तुम्ही गुंतवणूक करणे चालू केले तर तुम्हाला महिन्याला एक लाख रुपयांची पेन्शन मिळू शकते. समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला एनपीएस योजनेत 3,475 रुपये गुंतवण्यास सुरुवात केली आणि हीच गुंतवणूक सलग 47 वर्षांपर्यंत केली तर वयाच्या 65 व्या वर्षी तुम्ही निवृत्त झाल्यास तुम्हाला प्रतिमहिन्याला एक लाख रुपयांपेक्षा अधिक पेन्शन मिळू शकते.

30 वर्षे झालेले असल्यावर किती रुपये गुंतवावेत?
समजा तुमचे वय 30 वर्षे आहे. तुम्हाला एक लाख रुपये प्रतिमहिना पेन्शन हवी असेल तर तुम्हाला एनपीएस खात्यात प्रत्येक महिन्याला 15,000 रुपये जमा करावे लागतील. तसे केल्यास तुम्हाला एक लाख रुपये मिळू शकतात.

एनपीएस ही एक शासकीय योजना
दरम्यान, एनपीएस ही एक शासकीय योजना आहे. त्यामुळे या योजनेत गुंतवलेले पैसे हे बुडण्याचा धोका नसतो. त्यामुळे या योजनेत शक्य होतील तेवढ्या पैशांची गुंतवणूक करता येते. जेवढी लवकर या योजनेत गुंतवणूक केली, तेवढाच जास्त फायदा होतो.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *