‘फोनोफोबिया’ म्हणजे काय?; लक्षणे अन् उपचार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जुन ।। प्रत्येक व्यक्तीला निश्चितपणे कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती किंवा चिंता असते. एखाद्या गोष्टीची भीती ही आपल्या जीवनातील इतर भावनांसारखी असते. भीती कोणत्याही प्रकारची असू शकते. तुम्ही लोकांकडून ऐकले असेल की, त्यांना उंच ठिकाणांची भीती वाटते किंवा कोणीतरी खोल पाण्याला घाबरते. पण जेव्हा ही भीती सामान्य नसते तेव्हा त्याला ‘फोबिया’ म्हणतात. मात्र तुम्ही कधी फोनोफोबियाबद्दल ऐकले आहे का?

फोनोफोबिया, जो मुख्यतः लहान मुलांमध्ये दिसून येतो. असे लोक अचानक मोठ्या आवाजाने घाबरतात. पण जर हा त्रास वडिलधार्‍यांमध्ये होत असेल, तर असे लोक कोणत्याही पार्टीत, फंक्शनला किंवा घराबाहेरही जायला घाबरतात. जर फोन वाजला, तर एखाद्याला घबराट आणि घाम येणे सुरू होते, म्हणजेच फोन वाजल्यासारख्या मोठ्या आवाजामुळे उद्भवलेल्या घबराटपणाला ‘फोनोफोबिया’ म्हणतात.

फोनोफोबियामध्ये, एखादी व्यक्ती फोनवर बोलत असतानाही संकोच करते. जर तुम्हाला फोनची रिंग ऐकू आली तर तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते आणि वेगाने श्वास घेण्यास सुरुवात होते. तुमची समस्या किती मोठी आहे, यावर या समस्येचे उपचार अवलंबून असतात. मोठ्या आवाजातील रिंगटोन आणि अवेळी कॉलमुळे फोनोफोबियामुळे चिंता निर्माण होते. अमेरिकेतील 15 दशलक्ष लोकांमध्ये ही समस्या दिसून आली आहे. फोनोफोबियाची लक्षणे जाणून घेऊया : तीव्र डोकेदुखी, वेगाने श्वास घेणे, घाम येणे, हृदयाचे ठोके वाढणे, गोंधळणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *