महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जुन ।। Vitamin B12 Foods : निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टींचा योग्य समतोल राखला तर आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. संतुलित आहारामध्ये फळे, हिरव्या पालेभाज्या, दूध, मांस, अंडी इत्यादी खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा.
या सर्व घटकांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स इत्यादी पोषकतत्वांचा समावेश असतो. ही सर्व पोषकतत्वे आपल्या शरीराच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात.
या पोषकतत्वांमध्ये व्हिटॅमिन B12 चा ही समावेश आहे. हे व्हिटॅमिन आपल्या शरीरारासठी अतिशय लाभदायी आहे. आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी, मेंदूचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आणि शरीरातील लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी हे व्हिटॅमिन अतिशय महत्वाचे आहे.
जर तुम्हाला या व्हिटॅमिन B12 चा आहारात समावेश करायचा असेल तर तुम्ही खालील पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करू शकता. कोणते आहेत हे खाद्यपदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.
दूध
कॅल्शिअम अन् व्हिटॅमिन B12 चा उत्तम स्त्रोत म्हणून दूधाला ओळखले जाते. आपल्या आरोग्यासाठी दूध अतिशय लाभदायी आहे. त्यामुळे, दुधाचा तुमच्या आहारात जरूर समावेश करा. कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन B12 व्यतिरिक्त दुधामध्ये प्रथिने, खनिजे आणि इतर पोषकघटकांचे विपुल प्रमाण आढळते.
मासे
त्वचा-केसांसाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असणारे मासे खायला अनेकांना आवडते. प्रथिनांसोबतच व्हिटॅमिन B12 चा उत्तम स्त्रोत म्हणून माशांना ओळखले जाते. सार्डिन, ट्यूना, सॅल्मन, ट्राउट इत्यादी प्रकारच्या माशांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन B12 आणि इतर पोषकघटक आढळतात.
दही
जर तुम्ही शाकाहारी असाल आणि तुम्ही मासे, अंडी, चिकन हे खाद्यपदार्थ खात नसाल तर तुम्ही दह्याचा आहारात समावेश करू शकता. दह्याला प्रथिने, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन B12 चा प्रमुख स्त्रोत म्हणून ओळखले जाते. दह्यामुळे आपले आरोग्य निरोगी ठेवण्यास ही मदत होते.
पनीर-चीज
व्हिटॅमिन B12 ची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करू शकता. या पदार्थांपैकी पनीर, चीज, दही इत्यादी गोष्टींचे सेवन करण्याला प्राधान्य द्या. या खाद्यपदार्थांमध्ये व्हिटॅमिन B12 चे विपुल प्रमाण आढळते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.