मनोज जरांगेंनी निर्वाणीचा इशारा देताच राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे उघडले; शंभुराज देसाई अंतरवाली सराटीत जाणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जुन ।। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) अंतरवाली सराटीमध्ये सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालवत चालली आहे. दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी उपचार घेतले होते. पण सरकार जोपर्यंत तोडगा काढणार नाही, तोपर्यंत उपचार घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबतचा तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत. सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरावाली सराटी (Antarwali Sarati ) येथे दाखल होणार आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्याविषयी चर्चा करण्यात येणार असल्याचं समजतेय.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्याबाबत (Kunbi Maratha)चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. आज सरकारचे शिष्टमंडळ आंतरावली सराटीमध्ये दाखल होणार आहे. राज्य सरकारच्या वतीने मंत्री शंभूराजे देसाई येणार आहेत. दुपारी एक वाजता शंभूराजे देसाई मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार आहेत. मनोज जरांगे यांच्या मागण्याबाबत ते चर्चा करणार आहेत. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी शंभूराजे देसाई प्रयत्न करणार आहेत. दरम्यान, याआधी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत मनोज जरांगे यांच्या भेटीला आले होते. त्यांच्या शिष्टाईनंतर मनोज जरांगे यांनी उपचार घेतले होते. आता शंभूराज देसाई चर्चेसाठी जालनामध्ये येणार आहेत.

मनोज जरांगेंच्या भेटीला खासदार-आमदारांची रांग –
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. 8 जून 2024 पासून मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. त्यांना भेटण्यासाठी राज्यातील खासदारांनी हजेरी लावली होती. विशेषकरुन शिससेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेसच्या खासदारांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. बजरंग सोनवणे यांच्यासह इतर खासदारांनी राज्यपालांना पत्र लिहून आपण दखल घ्यावी, राज्य सरकार मनोज जरांगेंच्या उपोषणाबाबत उदासीन असल्याचं म्हटले होते. त्यानंतर आता राज्य सरकार याबाबत सक्रीय झालेय.

सहा दिवसांपासून उपोषण –
गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातंर्गत शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला ओबीसी (OBC Resrvation) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी लावून धरली आहे. तसेच कुणबी नोंदी (Kunbi Maratha) असलेल्या मराठा बांधवांना सगेसोयऱ्यांच्या व्याखेत बसणारे आरक्षणही लागू व्हावे, असे मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे. आता याबाबत तोडगा काढण्यासाठी सरकारच्या वतीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *