Income Tax Return: करदात्यांसाठी महत्वाची अपडेट! ITR फाईल करणार असाल तर चेक करा या गोष्टी, अन्यथा…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जुन ।। देशभरातील नोकरदार लोकांमध्ये सध्या इन्कम टॅक्स (आयकर) रिटर्न भरण्याची लगभग सुरू असेल. दरवर्षीप्रमाणे यावेळीही प्राप्तिकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. नोकरदार वर्गाला आयकर रिटर्न भरण्यासाठी फॉर्म १६ आवश्यक असतो. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही नक्कीच फॉर्म १६ बद्दल ऐकले असेल, त्यामुळे रिटर्न भरणे सोपे जाते. फॉर्म १६ दरवर्षी नोकरदार लोकांना त्यांच्या कंपनीद्वारे (नियोक्ता) जारी केला जातो ज्यामध्ये एकूण उत्पन्न, निव्वळ उत्पन्न, करदात्यांच्या उत्पन्नातून (टीडीएस) कपात केल्याची संपूर्ण माहिती दिली जाते.

फॉर्म १६ जारी कधीपर्यंत मिळतो
प्राप्तिकर नियमांनुसार प्रत्येक कंपनीने १५ जूनपर्यंत कर्मचाऱ्यांना फॉर्म १६ जारी करणे आवश्यक असते. यामध्ये दिलेली माहिती मागील आर्थिक वर्षाची आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक असून यामुळे मार्चमध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षाचे रिटर्न भरण्यासाठी दरवर्षी त्याचा वापर केला जातो ज्याचे भाग A आणि भाग B असे दोन भाग आहेत. भाग A मध्ये प्रत्येक आर्थिक तिमाहीत उत्पन्नातून कपात केलेल्या कराची माहिती दिली जाते.

माहिती जुळवून पाहा
तुम्हाला फॉर्म १६ मिळाला असेल, तर फॉर्म 26AS मध्ये दर्शविलेल्या टीडीएसची रक्कम फॉर्म १६ मध्ये दर्शविल्याप्रमाणे आहे की नाही याची खात्री केली पाहिजे. दोघांमध्ये काही फरक असल्यास तुमच्या कंपनीला कळवावे लागेल जे टीडीएस डेटा तपासतील आणि त्रुटी सुधारित करतील ज्यामुळे तुम्हाला नंतर कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.

उत्पन्नाची संपूर्ण माहिती
फॉर्म १६ च्या भाग B मध्ये आर्थिक वर्षात कर्मचाऱ्याला पगार म्हणून देण्यात आलेल्या एकूण रकमेची माहिती दिली जाते ज्यामध्ये कंपनीकडून कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यांचीही माहितीसह वजावट आणि सवलतींचीबाबत स्पष्ट उल्लेख केलेला असतो. या आधारावर कर्मचाऱ्यांचे निव्वळ वेतन मोजले जाते आणि करदात्यांना कर भरावा लागतो.

फॉर्म 26AS मध्ये दिलेल्या माहितीशी जुळवा
करदात्यांनी प्राप्तिकर वेबसाइटवरून फॉर्म 26AS डाउनलोड केला असेल, तर त्यात दिलेली माहिती फॉर्म १६ शी जुळणे आवश्यक असून एकूण कर कपात आणि जमा कराची माहिती दोन्ही कागदपत्रांमध्ये उपलब्ध असते, त्यामुळे दोघांमध्ये कोणताही फरक नसावा. या दोन्ही रक्कम समान असतील तर तुम्ही आयकर रिटर्न भरू शकता पण दोन्ही फॉर्ममधील माहिती जुळत नसल्यास ती दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *