‘जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे…’ कोकणात उदय सामंत यांच्या बॅनरमधून कोणाला थेट इशारा?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जुन ।। लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असले तरीही काही ठिकाणी धुमसणारी ठिणगी मात्र अद्याप शमलेली नाही. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये राजकीय खटके उडताना दिसत असून, कोकणही यास अपवाद ठरलेला नाही. (Konkan) कोकणातील राजकीय नाट्यानं कायमच संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलेलं असताना आता इथूनच एका नव्या गोष्टीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘वक्त आने दो …जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे’ अशा आशयाचे बॅनर कणकवलीत लागले असून, या बॅनरवर उदय सामंत आणि किरण सामंत यांचा फोटो पाहायला मिळत आहे. कणकवली शिवसेना शाखेबाहेर लागलेला हा बॅनर नेमका कोणाला इशारा देण्यासाठी आहे, याचसंदर्भातील उलट सुलट चर्चा सध्या या भागामध्ये सुरु आहेत.

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात कुजबूज सुरू झाली होती. सामंत बंधुंवर अनेकम आरोपही करण्यात आले होते. त्यातूनच हा बॅनर लावून राणेंना इशारा देण्याचा प्रयत्न असल्याची ही चर्चा आता कोकण पटट्यामध्ये रंगू लागली आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात या बॅनरची चर्चा असून, तो लावण्यामागचा हेतू काय? यासंदर्भातील कयास लावण्याचा प्रयत्न अनेकजण करताना दिसत आहेत.

कणकवलीणध्ये लावण्यात आलेल्या या बॅनरवर ‘उदयजी सामंत आणि किरणजी सामंत यांच्या भावी राजकीय वाटचालीस लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा’ असं लिहिण्यात आलं असून, ‘वक्त आने दो, जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे’ असंही लिहिलं गेलं आहे. या बॅनरवर शिवसेनेचं चिन्हं, धनुष्यबाण दिसत असून, मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांचे फोटोही पाहायला मिळत आहेत.

रत्नागिरी सिंधुदुर्गमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सूक असणाऱ्या किरण सामंत यांचा फोटो दिसल्यामुळं आणि या बॅनरवरील शब्दांमुळं अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *