![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ मार्च २०२६ ।।
मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)
मानसिक व्यग्रता जाणवेल. ध्यानधारणेचा मार्ग धरावा. भावनेच्या भरात कोणतेही काम करू नका. काही वेळेस शांत राहणेच फायद्याचे ठरेल हे लक्षात ठेवा. आवडीचे पदार्थ चाखाल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)
घरगुती कामाचा व्याप वाढेल. व्यावसायिक गणिते नीट अभ्यासावीत. अधिकार्यांची गाठ पडेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेता येईल. पत्नीची उत्तम साथ मिळेल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)
कामे मनाजोगी पार पडतील. मनातील सुप्त इच्छा पूर्ण करता येतील. गोड बोलण्यातून कामे साधता येतील. अधिकारी व्यक्तींचा मोलाचा सल्ला मिळेल. दिवस चांगल्या लोकांच्यात घालवाल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)
आपली पत सांभाळण्याचा प्रयत्न करावा. कामात चंचलता आड आणू नये. वरिष्ठांचा शब्द मानावा लागेल. मनातील अनामिक भीती बाजूला. आत्मविश्वास कमी पडू देवू नका.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)
नैराश्याला बळी पडू नका. फसवणुकीपासून सावध राहावे. मैत्रीचे नाते जपावे. जमिनीच्या कामास गतीमानता येईल. अति श्रमाचा थकवा जाणवेल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)
सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडतील असे नाही. मानसिक चांचल्य दूर सारावे. योग्य संधीची वाट पहावी. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. पत्नीशी मतभेद संभवतात.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)
प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. घरगुती प्रश्न चर्चेने सोडवावे. वाहन विषयक कामे निघतील. आरोग्यात सुधारणा होईल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)
कामाचा विस्तार वाढवावा. जवळच्या प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल. दिवस खेळीमेळीत जाईल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)
प्रवासात सावध राहावे. नातेवाईकांचा विरोध होऊ शकतो. कौटुंबिक कलह टाळावा. गरज नसतांना पैसे खर्च करू नका. स्वत:मध्ये काही बदल करून पहावेत.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)
पोटाचे विकार संभवतात. खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे. हातात नवीन अधिकार येतील. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. उगाचच चिडचिड करू नये.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)
जास्त खोलात जाऊन चौकशी कराल. आपले मत योग्य ठिकाणीच मांडावे. काही गोष्टीत धूर्तपणे वागावे लागेल. योग्य तर्काचा आधार घ्यावा. वाणीत गोडवा ठेवावा.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)
चंचलतेवर मात करावी. मुलांचा हट्ट पुरवाल. वेळेचे योग्य नियोजन करावे. थोडा त्रास झाला तरी कमाई वाढेल. भावनेला आवर घालावी लागेल.