Chhagan Bhujbal on Sharad Pawar : लोकसभेला आणि राज्यसभेला डावललं गेलं, पुन्हा शरद पवारांकडे घरवापसी करणार का? छगन भुजबळ म्हणाले…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जुन ।। Chhagan Bhujbal on Sharad Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची नाशिक लोकसभा लढवण्याची इच्छा होती. मात्र, महायुतीकडून ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली. त्यामुळे त्यांना लोकसभा लढवता आली नाही. त्यानंतर राज्यसभेची जाण्याची संधी असताना अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना संधी दिली. शिवाय, छगन भुजबळ सातत्याने महायुतीच्या विरोधात वक्तव्य करतानाही दिसले आहेत. त्यामुळे छगन भुजबळ पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार का? असा सवाल उपस्थित होतं होता. आता छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबतचे उत्तर दिले आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ म्हणाले, मीडियाला वाटतं की, मी घरवापसी करणार आहे. हा मीडियाचा प्रचार आहे. मी नेहमी सत्याची बाजू घेत आलेलो आहे. जे खरं आहे ते मी बोलत असतो. एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसेल तर मी सांगतो की, मला या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही. मी शरद पवारांच्या पक्षात जाणार नाही. मी कोणतीही खिडकी उघडी ठेवलेली नाही. ना दरवाजा उघडा नाही. कोणीही माझ्यासाठी रेड कार्पेट टाकलेलं नाही.

मी आहे त्या पक्षात आणि महायुती बरोबर राहणार आहे
भुजबळ पुढे बोलताना म्हणाले, वस्तूस्थिती काय आहे ? हे पाहून आपल्याला पुढील पाऊलं टाकायची आहेत. त्याच्यापूर्वी आपल्याला काहीतरी धडा घ्यायचा आहे. आपल्या ज्या काही त्रृटी असतील त्या दूर करुन महायुतीला पुढील निवडणुकीला सामोरे जायचे आहे. मी आहे त्या पक्षात आणि महायुती बरोबर राहणार आहे, असंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

आज राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवन, पुणे येथे झालेल्या बैठकीला उपस्थित होतो.

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा येथील पहिली मुलींची शाळा येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्या… pic.twitter.com/RFRQ8oMIIK

— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) June 14, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *