Fruits Price Hike : भाज्यांनंतर आता फळंही महागली; हि फळ 400 रुपये किलो

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जुन ।। उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाच्या सुरुवातीला काळेशार जांभूळ बाजारात विकण्यासाठी येतात. आरोग्यासाठी शरीराला जांभळाचे अनेक फायदे आहेत. मात्र हे फळ कमी कालावधीसाठी असते. निसर्गाने निर्माण केलेले हे फळ शरीरामध्ये अमृतासमान कार्य करते.

ग्रीष्म ऋतूत आंबा हे अमृतफळ असते तर वर्षाऋतूत जांभूळ हे अमृतफळ असते. लांबट आकाराची जांभळे ही खरोखरच चवीला आंबट-गोड आणि रसरशीत असतात. जांभळांचा आस्वाद हा तृप्तिदायक, आल्हाददायक असतो. मात्र हे फळ खाण्यासाठी परवडणारे नाही कारण याचे भाव गगनाला भिडले आहेत.

जुन्या काळात सहज झाडाखाली जाऊन खाल्ली जाणारी हे जांभूळ आता बाजारपेठेतून तब्बल 400 रुपये किलोने विकत घ्यावे लागत आहेत. दरम्यान इतका भाव वाढलेला असतानाही ज्यांना शुगरचा त्रास आहे असे ग्राहक खरेदी करण्यासाठी येत असल्याच विक्रेत्यांकडून संगाण्यात येतय.

त्यामुळे वर्षांऋतूत जांभूळ हे अमृतफळ खानं सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर झालं आहे. यासह मे महिन्याच्या शेवटीच बाजारात लीची हे फळ देखील दाखल झालं आहे. तळप्या उन्हात लिची प्रत्येकाला खाली वाटते. मात्र लिचीचा भावही गगणाला भीडला असून १०० रुपये पाव किलो म्हणजे ४०० रुपये किलोने लिची बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

संत्रीच्या किंतमी देखील वाढल्या बाजारत ऑरेंज सुद्धा ४०० रुपये किलोने विकले जात आहेत. गेल्या वर्षी मुबलक पाऊस न पडल्याने उत्पादन घटले होते. याचा परिणाम आता पालेभाज्यांवर देखील होऊ लागला. पाले भाज्यांचे दर १०० च्या पुढे पोहचले आहेत.

किरकोळ बाजारात फरबी, वाटाणा आणि दोडका अशा भाज्या १६० रुपये किलोने विकल्या जात आहेत. तसेच कांदा आणि बटाट्याच्या दरातही किंचीत वाढ झाली आहे. दर वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला याचा मोठा फटका बसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *