SBI चा कर्जधारकांना मोठा झटका; कर्जे महागणार, जास्तीचा EMI भरावा लागणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जुन ।। अनेकजण घर खरेदीसाठी, कार खरेदीसाठी किंवा वैयक्तिक कामांसाठी लोन घेतात. बँकामध्ये चांगल्या व्याजदरात लोन घेता येते. वेगवेगळ्या बँकाची वेगवेगळी लोन पॉलिसी आहे. यात त्यांचे वेगवेगळे व्याजदर ठरलेले असतात. मात्र, आता स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे होम घेणाऱ्या ग्राहकांना जास्त पैसे द्यावे लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक धोरणाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.


रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरीही होम लोनवरील व्याजदर वाढवले आहे. यामुळे ग्राहकांना जास्त पैसे भरावे लागणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने १५ जूनपासून १० बेस पॉईंट्स किंवा ०.१ टक्क्यांनी कर्ज दराची मार्जिनल कॉस्ट वाढवली आहे. एसबीआयच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाचा ईएमआय वाढणार आहे. यामुळे तुम्हाला आधीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागणार आहे.

एसबीआयने एक वर्षाचा एमसीएलआर (MCLR) ८.६५ टक्क्यांवरुन ८.७५ टक्के वाढवला आहे. एक महिना ते तीन महिन्यांच्या एमसीएलआरवर ८.२० टक्क्यांवरुन ८.३० टक्के वाढवला आहे. सहा महिन्यांचा एमसीएलआर ८.५५ टक्क्यांवरुन ८.६५ टक्के झाला आहे. दोन वर्षांसाठीचा एमसीएलआर ८.८५ टक्के झाला आहे. तर तीन वर्षांचा एमसीएलआर ८.८५ टक्क्यांवरुन ८.९५ टक्के झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *