Neet Result Controversy: नीट परीक्षेत गडबड झाली, सुप्रीम कोर्टात प्रकरण पोहोचल्यानंतर शिक्षण मंत्र्यांची कबुली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुन ।। नीटपरीक्षेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. शिक्षण मंत्र्यांकडून उशिरा का होईना, परंतु परीक्षेत गडबड झाल्याची कबुली देण्यात आली आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काही ठिकाणी नीट परीक्षेत गडबड झाल्याची कबुली दिली आहे. यामध्ये कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचा सहभाग आढळल्यास त्याला सोडले जाणार नसल्याची प्रतिक्रिया देखील शिक्षण मंत्र्यांनी दिली आहे.

परीक्षा (Neet Result Controversy) आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये (NTA) सुधारणा करण्याची गरज असल्याचंही प्रधान यांनी मान्य केलं आहे. विद्यार्थ्यांकडून वारंवार नीट परीक्षेत गडबड झाल्याचा दावा केला जात असताना परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करत विद्यार्थी सुप्रीम कोर्टात गेले आहेत. परीक्षेत कुठलाही घोटाळा झाला नसल्याचा दावा यापूर्वी धर्मेंद्र प्रधान यांनी वारंवार केला होता, त्यावरून विरोधी पक्षांनी प्रधान यांच्यावर टीका केली (Neet Exam) होती.

बिहार, गुजरातसारख्या राज्यांमध्ये नीट २०२४ पेपर लीक आणि अखिल भारतीय परीक्षेतील इतर अनियमिततेचे आरोप समोर आले आहेत. सॉल्व्हर गॅंगचे लोक पकडले जात आहेत. डमी उमेदवारांची नियुक्ती आणि नीट परीक्षा केंद्राला मॅनेज १० ते ४० लाख रुपयांमध्ये केलं असल्याची माहिती मिळत आहे. नीट परीक्षा २०२४ रद्द करण्याच्या याचिका अजूनही सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या जात (Education Minister Dharmendra Pradhan) आहेत.

नीट २०२४ परीक्षा ५ मे रोजी४७५० केंद्रांवर घेण्यात आली होती. यावेळी परीक्षेत सुमारे २४ लाख उमेदवार उपस्थित होते. एनटीएनेच सुरुवातीला नीटचा निकाल 14 जून रोजी जाहीर केला जाईल, असं सांगितले (Neet Result) होतं. परंतु नीट २०२४ चा निकाल सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी ४ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता घोषित करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *