महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुन ।। टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत लवकरच साखळी फेरीतील सामने समाप्त होऊन सुपर ८ फेरीतील सामन्यांना सुरवात होणार आहे. सुपर ८ फेरीत प्रवेश करणारे ८ संघ ठरले आहेत. सुपर ८ मध्ये प्रवेश करणाऱ्या संघांना २ गटात विभागण्यात आलं आहे. पहिल्या गटात भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या संघांचा समावेश करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटात इंग्लंड, अमेरिका, वेस्टइंडिज आणि दक्षिण आफ्रिका या ४ संघांचा समावेश आहे. दरम्यान या २ गटातून प्रत्येकी २-२ संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहेत.
भारतीय संघाचे सामने कधी?
भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्याने आपल्या सुपर ८ फेरीतील सामन्यांना सुरुवात करणार आहे. हा सामना २० जून रोजी बारबाडोसमध्ये रंगणार आहे. तर २२ जून रोजी भारतीय संघाचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. हा सामना अँटीग्वातील सर विव रिचर्ड्सच्या मैदानावर रंगणार आहे.
तर मोठा सामना २४ रोजी होणार आहे. सेंट लुसियामध्ये होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. दोन्ही गटात ४-४ संघ आहेत. दोन्ही गटातील टॉप २ संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहेत. भारतीय संघाला अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशकडून आव्हान मिळणार आहे.
The schedule for the Super Eight stage of the #T20WorldCup has now been finalised ????
Details ➡ https://t.co/K8gXT3Qngg pic.twitter.com/UPYqnbo3mx
— ICC (@ICC) June 17, 2024
दुसऱ्या गटात तुफान फॉर्ममध्ये असलेल्या संघांचा समावेश आहे. ज्यात अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांचा समावेश आहे. या गटातील पहिला सामना १९ जून रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध अमेरिका या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर २० जून रोजी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात यजमान वेस्टइंडिजचा संघ गतविजेत्या इंग्लंडचा सामना करताना दिसेल. २१ जून रोजी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. तर २३ जून रोजी अमेरिका विरुद्ध इंग्लंड आणि २४ जून रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्टइंडिज यांच्यात सामना रंगणार आहे.
असं आहे भारतीय संघाचं सुपर ८ फेरीतील सामन्यांचं वेळापत्रक
भारत विरुद्ध अफगाणिस्तान , २० जून रात्री ८ वाजता, बारबाडोस
भारत विरुद्ध बांगलादेश, २२ जून रात्री ८ वाजता, अँटीग्वा
भारत विरुद्ध आस्ट्रेलिया, २४ जून रात्री ८ वाजता, सेंट लूसिया