AI तंत्रज्ञानाने ७० वर्षीय आजोबा कॅन्सरमुक्त, राज्यातील पहिल्या यशस्वी शस्त्रक्रियेचा दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुन ।। दिवसेंदिवस जगात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. त्यातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा एआय तंत्रज्ञान वापरून अनेक अशक्य गोष्टी शक्य केल्या जात आहेत. अशाच प्रकारे AI तंत्रज्ञान वापरून चक्क कर्करोग बरा करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे असणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून कॅन्सर बरा करण्यात यश आल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.

राज्यातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया
आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी वापरून कर्करोगग्रस्त रुग्णाला रेडिओलॉजिस्टच्या मदतीने बरे करण्यात आले आहे. राज्यातील ही पहिली यशस्वी शस्त्रक्रिया असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

फुफ्फुसाचा कॅन्सर
मावळ येथील एका सत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला फुफ्फुसांचा कॅन्सर झाला होता. त्यांची घरची परिस्थिती फारच हलाखीची होती. मावळच्या तळेगाव दाभाडे येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये या रुग्णाने उपचार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्रथमदर्शनी या रुग्णाला फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर डॉक्टरांनी या रुग्णाला रेडिएशनच्या मार्फत कॅन्सरची गाठ काढण्याचे सांगितले. त्यानुसार डॉक्टरांनी या रुग्णाची फुफ्फुसातील कॅन्सरची गाठ एआय टेक्नॉलॉजीच्या मार्फत काढली.

या प्रक्रियेला साधारणतः एक ते दोन महिन्याचा कालावधी गेला. त्यानंतर मात्र आता हा सत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिक रुग्ण ठणठणीत बरा असल्याचे पाहायला मिळत आहे.

डॉक्टरांवर स्तुतिसुमने
AI टेक्नॉलॉजी मुळे नोकऱ्या धोक्यात येतील असा एक समज लोकांमध्ये होता. मात्र आता याच एआय टेक्नॉलॉजी मार्फत मेडिकलमध्ये खास करून कॅन्सर रुग्णांसाठी ही एआय टेक्नॉलॉजी वापरून कॅन्सर बरा करण्यात यश आली आहे. त्यामुळे या पद्धतीचा वापर आता कुठल्या कुठल्या क्षेत्रात केला जाईल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. मात्र हे ऑपरेशन यशस्वी झाल्याने कॅन्सर रुग्णालयातील डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक होत आहेत. कारण ही एआय टेक्नॉलॉजी वापरून कॅन्सर बरा करण्याची महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे.

कर्करोगावर प्रभावी उपचार पद्धती करून या आजारातून बरं करण्याचं कार्य येथील डॉक्टरांच्या टीमला जात आहे. ही उपचार पद्धती आजारी व्यक्तीला वरदान ठरत असून त्याचा फायदा नक्कीच कर्करोगींना मिळताना दिसून येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *