NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या ‘या’ हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुन ।। शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा रस झपाट्यानं वाढत आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. याबाबत वेळोवेळी एक्स्चेंज गुंतवणूकदारांना सावध करत असतात. गुंतवणुकीशी संबंधित टिप्स देणाऱ्या इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामच्या चॅनल्सविरोधात नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (एनएसई) गुंतवणूकदारांना सावध केलंय. एक्स्चेंजनं गुंतवणूकदारांना डब्बा/बेकायदेशीर ट्रेडिंगपासून सावध केलं आहे. पाहूया एनएसईनं यावेळी कोणत्या चॅनेल्स किंवा अकाऊंट्सबद्दल अलर्ट केलंय.

कोणत्या चॅनल्सविरोधात इशारा?
एनएसईनं इन्स्टा हँडल ‘bse_nse_latest’ आणि टेलिग्राम चॅनेल ‘BHARAT TARDING YATRA’ विरोधात इशारा दिला आहे. ते ट्रेडिंगसाठी सिक्युरिटीज मार्केट टिप्स देण्याचं काम करतात आणि गुंतवणूकदारांच्या ट्रेडिंग अकाऊंट्स हँडलिंग ऑफर करतात. एनएसईनं अवैध व्यापार करणाऱ्या संस्थांकडून वापरले जाणारे मोबाइल क्रमांकही शेअर केले आहेत. एनएसईनं एका वेगळ्या प्रसिद्धीपत्रकात ‘बेअर अँड बुल प्लॅटफॉर्म’ आणि ‘इझी ट्रेड’शी संबंधित आदित्य नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला आहे. ही व्यक्ती डब्बा/बेकायदेशीर सर्व्हिसेस सेवा पुरवत असल्याचं त्यांनी म्हटलंय. एनएसईनं 8485855849 आणि 9624495573 हे दोन मोबाइल क्रमांकही सार्वजनिक केले आहेत. एनएसईचे म्हणण्यानुसार या व्यक्तीची एनएसईच्या कोणत्याही नोंदणीकृत सदस्याची अधिकृत सदस्य म्हणून किंवा स्वत: सदस्य म्हणून नोंदणी नाही. एनएसईनं यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

योग्य ब्रोकर कसा ओळखाल?
आता तुमचा ब्रोकर योग्य आहे की अयोग्य याची माहिती सहजरित्या शोधता येऊ शकते. यासाठी एनएसईच्या वेबसाइटवर जावं लागेल. https://www.nseindia.com/invest/find-a-stock-broker लिंकच्या माध्यमातून Know/Locate your Stock Broker या सुविधेद्वारे गुंतवणूकदारांना रजिस्टर्ड मेंबर आणि अधिकृत व्यक्तीचा तपशील पाहू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *