महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुन ।। गोष्टी झटपट लक्षात रहाव्यात, तबडतोब निर्णय घेता यावेत अशा कामांसाठी आपली बुद्धी तीक्ष्ण आणि तल्लख असली पाहिजे. अनेकदा काही कामावेळी आपण चुकीचे निर्णय घेतो. भावनेच्याभरात एखाद्या व्यक्तीवर रागवतो किंवा जास्त चिडचिड करतो.
गोष्टी पूर्ण येत असून देखील ऐनवेळी प्रश्न विचारल्यास उत्तर देता येत नाही. त्यामुळे अपयशाचा पाढा वाढत जातो. अशा अनेक अडचणींमुळे व्यक्ती त्रस्त असतात. तुम्हाला देखील चुमच्या आयुष्यात अशा काही समस्या जाणवत असतील तर त्याचा अर्थ असतो तुमची मानसीक स्थिथी व्यवस्थित नाही. त्यामुळे आहारात कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत याची माहिती आज जाणून घेणार आहोत.
हळद आणि अद्रक
तीक्ष्ण बुद्धीसाठी आहारात हळद आणि अद्रकचे सेवन जास्त करणे गरजेचे आहे. दिवसभरातून १ ते २ ग्राम हळद बुद्धीसाठी चांगली असते. तसेच अद्रकमध्ये असलेले घटक आपल्या आरोग्यासह बुद्धीला चालना देण्याचे काम करतात. फक्त हळद आणि अद्रक या दोन्हीचे सेवन उन्हाळ्यात कमी आणि थंडीत जास्त केले पाहिजे.
नॉनव्हेज
अनेक व्यक्ती सतत नॉनव्हेज जास्त खातात. मात्र मांसाहार करणाऱ्या व्यक्तींची बुद्धी जास्त तीक्ष्ण नसते. आहारात कायम पालेभाज्यांचा समावेश केल्यास त्याने आपल्या विचारांवर आणि बुद्धीवर चांगला परिणाम होतो.
तेल आणि तूप
बाजारात विविध प्रकारचे तेल आले आहेत. तेलांमध्ये मोहरी, सुर्यफूल आणि शेंगदाण्याचे तेल आपल्या आहारात असावे. ज्या व्यक्ती तूप खातात त्यांनी बाहेरचं तूप खाऊ नये. घरी स्वत: कढवलेलं तूप खावं. तेल आणि तुपाच्या बाबतीत या गोष्टी फॉलो केल्यास बुद्धी आणखी चलाख होते.