महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुन ।। MHADA News: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न म्हाडाकडून पूर्ण केले जाणार आहे. म्हाडाकडून तब्बल 13 हजार 43 घरं बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरांच्या बांधकामासाठी 8310 कोटींची तरतूद करण्यात आली असून ही घरं म्हाडाच्या मुंबई, कोकण, पुणे, संभाजीनगर, नाशिक आणि अमरावती या प्रादेशिक मंडळामध्ये उभारली जाणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच स्वतःच्या हक्काचं घरं घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.