महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जुन ।। राज्यात २६ जून रोजी विधान परिषद निवडणूका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. विधान परिषद निवडणुकांमुळे ३ दिवस ड्राय डे असणार आहे. २४ जून ते २६ जून दरम्यान ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. आता या तीन दिवसांच्या ड्राय डे मुळे हॉटेल आणि बार मालकांचे लाखोचे नुकसान होणार असल्याची माहिती मिळत आहे.
आता या ड्राय डेविरोधात हॉटेल अन् बार मालक आक्रमक झाले आहेत, ते कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वा देखील लोकसभा निवडणुकीमुळे तीन दिवस ड्राय डे पाळण्यात आला (Vidhan Parishad Election) होता. आता एकदा कोकण, नाशिक आणि मुंबईमध्ये विधानपरिषद निवडणूका होत आहेत. त्यामुळे ड्राय डेचा निर्णय घेण्यात आलाय. परंतु तीन दिवसांऐवजी एका दिवसासाठी ड्राय डेचा विचार करावा, अशी मागणी बार मालक करत आहेत.
‘ड्राय डे’मुळे हजारो कोटी रुपयांचे नुकसान
आता हॉटेल मालक आणि बार मालक यांच्या मागणीला काय प्रतिसाद मिळतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मुंबई आणि राज्यात इतर ठिकाणी हजारो दारूची दुकाने (Dry Day) आहेत. तीन दिवसांच्या ‘ड्राय डे’मुळे हजारो कोटी रुपयांच्या व्यवसायाचे नुकसान होईल, याशिवाय लाखो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होईल, असं बार मालक म्हणत (Liquior Shop Close) आहेत.
चार विधान परिषद मतदारसंघांमध्ये निवडणूक
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानपरिषद निवडणुकांचे वारे वाहत ( Vidhan Parishad News) आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार पुन्हा आमने सामने आहेत. मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार विधान परिषद मतदारसंघांमध्ये निवडणूका होणार आहेत. येत्या २६ जून रोजी निवडणूका होणार आहेत.