महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ जुन ।। Eknath Shinde News: रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. रिक्षा टॅक्सी चालकांना Gratuity देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. Gratuityसाठी रिक्षा टॅक्सी चालकांना वर्षाला ३०० रुपये भरावे लागणार आहेत. रिक्षा, टॅक्सी चालक जेव्हा ६५ वर्षाचे होऊन सेवानिवृत्त होतात तेव्हा ते गाडी चालवू शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्या पुढील भविष्यासाठी Gratuity पॉलिसी आणत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. यासाठी कल्याणकारी मंडळ काम करणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं आहे.