Maharashtra Politics ; शरद पवारांच्या गुगलीने छगन भुजबळांची झाली कोंडी? ठाकरे गटाची दारं बंद?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जुन ।। अजितदादांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थ असलेले भुजबळ ठाकरेंची मशाल हाती घेण्याच्या तयारी असल्याची जोरदार चर्चा रंगली. मात्र यात मोठा ट्विस्ट आला आणि भुजबळांना ठाकरेंच्या शिवसेनेची दारं बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भुजबळांच्या मातोश्रीवर जाण्याच्या मार्गात पवारांनी खोडा घातल्याचं बोललं जातंय. कारण मविआची स्टेअरिंग शरद पवारांच्या हातात आहे. आघाडीतले अनेक महत्त्वाचे निर्णय हे शरद पवारांच्या कलानं घेतले जातात. त्यामुळेच भुजबळांना प्रवेश दिल्यास आघाडीचा फेरविचार करण्याचा थेट इशाराच पवारांच्या निकटवर्तीयांनी दिल्याचं कळतंय. त्यामुळेच भुजबळांना ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याची दारं जवळपास बंद झाली आहेत. त्यामुळेच शरद पवारांची राष्ट्रवादीतले नेते भुजबळ अजितदादांचा पक्ष सोडण्याचा तयारीत असल्याचं ठामपणे सांगतात.

शरद पवारांनी अन्याय केल्याच्या भावनेतून अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा वेगळा घरोबा मांडला. हा बंडाचा झेंडा खांद्यावर घेण्या-या बिनीच्या शिलेदारांमध्ये नेहमी शरद पवारांना साथ देणा-या भुजबळांचाही समावेश होता. मात्र या बंडाला वर्ष होण्यापूर्वीच अजितदादांच्या राष्ट्रवादीत भुजबळांची घुसमट व्हायला लागलीय. त्यामुळेच आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात झालेल्या शिवसेनेत परतण्याची चाचपणी भुजबळांनी केली. मात्र हे फिसकटल्यामुळे आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही भुजबळांच्या ठाकरे गटात प्रवेशाच्या अफवा असल्याचा दावा करतायत.

महायुतीचा लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यामुळे आता विधासभेसाठी भुजबळ वेगवेगळे पर्याय तपासून पाहत आहेत. त्यामुळेच त्यांनी आता आपल्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनाही अॅक्टिव्ह केल्याचं बोललं जातंय. मात्र पवारांच्या भूमिकेमुळे अस्वस्थ भुजबळांची चांगलीच कोंडी झाली आहे. आगामी विधानसभेतही भुजबळ दादांचीच साथ देणार की दुस-या कुणाचा झेंडा खांद्यावर घेणार याची उत्सुकता लागलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *