AUS vs BAN Live : ऐतिहासिक! कमिन्सची हॅटट्रिक; बांगलादेशच्या ३ फलंदाजांचा करेक्ट कार्यक्रम, Video

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ जुन ।। AUS vs BAN T20 World Cup 2024 Live Match Updates : मागच्या सामन्यात बाकावर बसलेल्या पॅट कमिन्सने बांगलादेशविरूद्ध कमाल केली. यंदाच्या विश्वचषकातील पहिली हॅटट्रिक घेऊन कमिन्सने ऐतिहासिक कामगिरी केली. खरे तर दिग्गज ब्रेट लीनंतर (२००७) ट्वेंटी-२० विश्वचषकात हॅटट्रिक घेणारा कमिन्स दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या ४४व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश हे संघ भिडले. ऑस्ट्रेलियन संघाने विजयाचा चौकार लगावून सुपर-८ चे मध्ये प्रवेश केला. तर बांगलादेशला संघर्ष करावा लागला. सुपर-८ मधील ही लढत एंटीगुआ येथील सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळवली जात आहे.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या संघाने साजेशी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या कोणत्याच फलंदाजाचा टिकाव लागत नव्हता. पण, कर्णधार नजमुल हुसैन शांतोने कडवी झुंज देताना सर्वाधिक (४१) धावांची खेळी केली. त्याने १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३६ चेंडूत ४१ धावा केल्या. मात्र, त्याला देखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात ॲडम झाम्पाने यश मिळवले.

कमिन्सची हॅटट्रिक
ऑस्ट्रेलियाच्या वन डे संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने १८ व्या षटकातील अखेरच्या दोन चेंडूवर महमुदुल्लाह आणि महेदी हसन यांना बाद केले. त्यानंतर विसावे षटक घेऊन आलेल्या कमिन्सने पहिल्याच चेंडूवर तौहीद हृदयोयला बाहेरचा रस्ता दाखवला आणि आपली हॅटट्रिक पूर्ण केली. अखेर बांगलादेशने निर्धारित २० षटकांत ८ बाद १४० धावा केल्या अन् ऑस्ट्रेलियाला सुपर-८ मध्ये विजयाचे खाते उघडण्यासाठी १४१ धावांचे लक्ष्य दिले. मागच्या सामन्यात बाकावर बसलेला पॅट कमिन्स आज संघाचा भाग आहे. त्याने या सामन्याच्या अखेरच्या षटकांत अप्रतिम कामगिरी केली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करताना पॅट कमिन्सने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर ॲडम झाम्पा (२), मार्कस स्टॉयनिस, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

ऑस्ट्रेलियाचा संघ –
मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवुड.

बांगलादेशचा संघ –
नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), अंजिद हसन, लिटन दास, शाकिब अल हसन, तौहीद हृदयोय, महमुदुल्लाह, महेदी हसन, रिशन हुसैन, तस्कीन अहमद, तन्जीम हसन साकिब, मुस्ताफिजुर रहमान.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *