महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ जुन ।। सौदी अरबसह मध्य पूर्व आशियात उष्णतेची लाट पसरली असून प्रचंड उष्म्यामुळे हज यात्रेतील तब्बल एक हजार भाविकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. उष्णतेच्या लाटेचा हज यात्रेवर गंभीर परिणाम झाला आहे. आज तब्बल 550 हज यात्रेकरूंचा उष्माघाताने मृत्यू झाला. प्रचंड उष्म्यामुळे मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
हवामान बदलामुळे सौदीतील वातावरण वेगाने बदलत असून तापमान 50 अंश सेल्सियसहून अधिक आहे. त्यामुळे अक्षरशः भाजून काढणाऱया उन्हाचा अनुभव येथील लोक घेत आहेत. आज मक्का येथे तब्बल 51.8 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. यात्रेकरूंना उन्हाचा कमीत कमी त्रास व्हावा यासाठी स्थानिक प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.