Food Poisoning : पावसाळ्यात वाढतोय अन्न विषबाधेचा धोका..! अशा पद्धतीने करा उपाय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ जुन ।। Food Poisoning : पावसाळ्यात आरोग्याबाबत थोडा निष्काळजीपणाही अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. सध्या काही ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. देशातील काही भागांमध्ये अजून ही कडक उन्हाळा जाणवतोय. दमट तापमान आणि सूर्यप्रकाशामुळे उष्माघाताचा धोका तर असतोच, शिवाय या दिवसांमध्ये खाण्यापिण्याच्या सवयींबाबत निष्काळजीपणामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोकाही वाढतो.

पावसाळ्यात, दीर्घकाळ ठेवलेल्या अन्न किंवा पेयांमध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात. दूषित अन्न सेवन केल्याने तुम्हाला अन्नातून विषबाधा होऊ शकते आणि पचनाशी संबंधित अनेक गंभीर समस्या उद्‍भवू शकतात. अन्न विषबाधेमुळे पोटदुखी, अतिसार आणि उलट्या होऊ शकतात. त्याचवेळी, विषबाधा झाल्यावर वेळेवर उपचार न केल्यास, गंभीर निर्जलीकरण आणि इतर संबंधित समस्या होऊ शकतात. अन्नातून विषबाधा होण्याची कारणे कोणती आहेत आणि ते टाळण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत, हे समजून घेऊया.

समस्या का वाढते?
अन्न विषबाधेची समस्या मुख्यतः कोणत्यातरी जिवाणू किंवा विषाणूंनी संक्रमित अन्न खाल्ल्याने उद्‍भवते. जेव्हा तुम्ही दूषित पदार्थ खातात, तेव्हा पचनमार्गात बॅक्टेरिया वाढू लागतात आणि संसर्ग होतो. अन्न हाताळताना निष्काळजीपणा, स्वयंपाक करताना स्वच्छतेचा अभाव किंवा शिळ्या गोष्टी खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते. त्याची लक्षणे वेळीच ओळखून त्यावर उपचार करणे आवश्यक मानले जाते.

अन्न विषबाधा म्हणजे?
आजाराच्या कारणावर अवलंबून अन्न विषबाधाची लक्षणे बदलू शकतात. साधारणपणे, अन्न विषबाधामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि पेटके, शौचास रक्तस्त्राव, तापासह डोकेदुखी होऊ शकते.

वेळेत उपचार न केल्यास, गिळण्याची समस्या आणि अशक्तपणाचा धोकादेखील वाढतो. उलट्या आणि जुलाबावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास गंभीर निर्जलीकरण होऊ शकते. ज्यामुळे आरोग्याच्या गुंतागुंती वाढू शकतात.

उपाय काय करावा?
तुमची लक्षणे किती गंभीर आहेत आणि आजार कशामुळे होतो, यावर अन्न विषबाधेचे उपचार अवलंबून असतात. शरीरातील द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्सच्या कमतरतेवर मात करण्यासाठी प्रतिजैविकांची आवश्यकता असू शकते. जर आजार बॅक्टेरियामुळे झाला असेल तर तुम्हाला प्रतिजैविकांचीदेखील आवश्यकता असू शकते. फूड पॉयझनिंगच्या धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सेवनापूर्वी स्वच्छता आवश्यक
आपले हात नियमितपणे साबण आणि पाण्याने किमान २० सेकंद धुवा.

जेवण्यापूर्वी आणि नंतर हात धुवा.

फळे आणि भाज्या नीट धुतल्यानंतरच खा.

स्वयंपाकघरातील भांडी नीट स्वच्छ करा.

कच्चे किंवा कमी शिजवलेले अन्न खाऊ नका.

जास्त वेळ अन्न ठेवू नका. रेफ्रिजरेटरमध्येही अन्न चांगले झाकून ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *