Ind vs Ban : कर्णधार रोहित घेणार मोठा निर्णय ? ! स्पर्धेत सुमार कामगिरी करणाऱ्यांना बेंच वर बसवणार ? जाणून घ्या Playing-11

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ जुन ।। भारत आणि बांगलादेश यांच्यात आज अँटिग्वा सेंट लुसिया येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर सुपर 8 चा महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम चमकदार कामगिरी करत असतानाही कर्णधार रोहित शर्मा टेन्शनमध्ये दिसत आहे.

याचे कारण संघाचे दोन प्रमुख अष्टपैलू शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांची आतापर्यंतची कामगिरी. अशा परिस्थितीत भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो आणि बेंचवर बसलेल्या युझवेंद्र चहल, यशस्वी जैस्वाल किंवा संजू सॅमसन यापैकी कोणालाही संधी दिऊ शकतो.

टीम इंडिया शिवम दुबेच्या जागी संजू सॅमसनला संधी देऊ शकते, तर जडेजाच्या जागी युझवेंद्र चहल फिरकी विभागाची जबाबदारी सांभाळू शकतो. संजू सॅमसनच्या रूपाने एका अतिरिक्त फलंदाजाचा समावेश करणे हा भारतीय संघासाठी योग्य निर्णय ठरू शकतो.

युझवेंद्र चहलच्या रूपाने मुख्य फिरकी गोलंदाज संघात सामील झाल्याने गोलंदाजी विभागही मजबूत होईल. कुलदीप यादवने शेवटच्या सामन्यात पुनरागमन केले आणि अक्षर पटेल मुख्य अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत दिसत आहे. अशा स्थितीत जडेजाची बाहेर जाणे निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

शिवम दुबेची कामगिरीही या स्पर्धेत चांगली राहिलेली नाही. अमेरिकेविरुद्धच्या सामन्याशिवाय तो सर्वच बाबतीत फ्लॉप ठरला आहे. अशा परिस्थितीत संजू सॅमसन त्याच्या जागी टीम इंडियासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. याशिवाय टीम इंडियाला आणखी एका खेळाडूला आजमावण्याची संधी मिळणार आहे. यशस्वी जैस्वालला सलामीवीर म्हणून खेळवून विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर हलवता येऊ शकते कारण विराट कोहली सलामीवीर म्हणून आतापर्यंत फ्लॉप ठरला आहे.

बांगलादेशविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *