Andhra Pradesh| चंद्राबाबू अ‍ॅक्शन मोडमध्ये, जगनमोहन रेड्डी यांचे पक्ष कार्यालय केले उद्ध्वस्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ जुन ।। आंध्रप्रदेशमधील तेलगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री म्हणून नुकतिच शपथ घेतली. पदभार स्वीकारताच चंद्राबाबू नायडू अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या निवासस्थानानंतर आता त्यांच्या पक्षाचे वायएसआरसीपीचे ताडेपल्ली येथील मध्यवर्ती कार्यालय शनिवारी (दि.२१ जून) सकाळी बुलडोझरने उद्ध्वस्त (Andhra Pradesh) करण्यात आले.

आंध्रप्रदेश सरकारच्या यापूर्वीच्या कारवाईला जगनमोहन रेड्डी यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान न्यायालयाने प्रशासनाला मोडतोड थांबवण्याचे आदेश दिले होते. तरी देखील पुन्हा आज सकाळी (दि.२१जून) प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने बुलडोझरसह दाखल झाले आणि काही वेळातच त्यांनी वायएसआरसीपीचे ताडेपल्ली येथील पक्षाचे कार्यालय जमीनदोस्त (Andhra Pradesh) केले.

या कारवाईवर वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाने हे सूडाचे राजकारण असल्याचे म्हटले आहे. तसेच पुढील पाच वर्षांत आमचा पक्ष या धमक्या आणि राजकीय सूडबुद्धीपुढे झुकणार नाही, असे देखील ठणकावून सांगितले. जगनमोहन रेड्डी यांनी जनतेच्या वतीने लढण्याची शपथ घेतली आणि चंद्राबाबू नायडूंच्या या कृत्यांचा निषेध करण्याचे आवाहन देशातील सर्व लोकशाही शक्तींना (Andhra Pradesh) केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *