पावसाळ्यात या रोमँटिक पर्यटन स्थळी एकदातरी नक्की जा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जुन ।। Maharashtra couple monsoon places​ : पावसाळा सुरु झाला की सर्वांनाच वेध लागतात ते पावसाळी सहलीचे. एकमेकांना अदिक वेल देता यासाठी जोडपी मान्सून टूरचे प्लानिंग करतात. जोडप्यांची पहिली पसंती महाबळेश्वरला असते. मात्र, महाबळेश्वर व्यतीरीक्त आणखी काही पर्यटन स्थळ आहेत जिथे पावसाळ्यात पार्टनरसोबत इथं एकदातरी नक्की जायचा प्लान करा.

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. यामुळेच जोडप्यांची पहिली पसंती असते. लोणावळा, खंडाळा मध्ये देखील मान्सून ट्रीप प्लान करु शकता. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या लोणावळा, खंडाळा परिसरात अनेक रिसॉर्ट आणि व्हिला आहेत. येथे जोडीदारासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करता येईल.

माथेरान हे ठिकाण मुंबई, पुण्यापासून अगदी जवळचे ठिकाण आहे. यामुळे सुट्टी मिळत नसेल किंवा वेळ कमी असेल तर माथेरान हा सर्वोत्तम पर्याय आहे. कोणत्याही सिजनमध्ये माथेरानमध्ये पर्यटनाचा आनंद लुटता येतो. पावसाळ्यात माथेरानचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. अलिबाग हा चांगला पर्याय आहे. अगदी कमी बजेटमध्ये येथे मान्सून ट्रीपचा प्लान करता येऊ शकतो.

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे मालवण देखील खुपच सुंदर आहे. मालवणमधील सुंदर समुद्र किनाऱ्यावर जोडीदारासह निवांत वेळ घालवता येईल. पावसाळ्यात या समुद्र किनाऱ्यांवर फिरणे खूपच सुंदर अनुभव आहे.

रत्नागिरी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. अथांग, शांत समुद्र किनाऱ्यांसह रत्नागिरी जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळ आहे. गणपती पुळे, दापोली, हरिहरेश्वर यासह अनेक प्रसिद्ध टूरीस्ट पॉईंट रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. महाबळेश्वर व्यतीरीक्त महाराष्ट्रात आणखी काही अशी हनीमून स्पेशल पर्यटन स्थळ आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *