Sharad Pawar: पंढरीच्या वारीत पायी चालणार का?, शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं स्पष्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जुन ।। राज्यात वारीचा उत्साह दिसून येत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यंदाच्या आषाढी वारीत सहभागी होणार असल्याची त्याचबरोबर 7 जुलैला तुकोबांच्या पालखीत वारकऱ्यांसोबत चालणार असल्याची माहिती समोर आली होती. तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यात शरद पवार बारामती ते इंदापूरमधल्या सणसरपर्यंत पायी चालत सहभागी होणार असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. त्यावर आज झालेल्या पत्रकारपरिषदेत शरद पवार यांनी वारीत चालण्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मी वारीत चालणार बातमी खोटी आहे. पुण्यात पार पडलेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, ‘मी बारामती ते इंदापूरमधल्या सणसरपर्यंत पायी चालणार ही बातमी खोटी आहे. पंढरपूरला जाणारी वारी माझ्या गावावरून जाते. त्या ठिकाणी एक दिवस मी थांबणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी मी असणार आहे. मात्र मी पालखीसोबत चालणार नाही तर तिच्या स्वागतसाठी तिथे जाणार आहे.’

विधानसभा निवडणुकीवर शरद पवारांची प्रतिक्रिया
सध्या आमचे पूर्ण लक्ष हे विधानसभा निवडणुकीकडे आहे. ज्याप्रकारे अर्जुनाचे लक्ष हे पक्षाच्या डोळ्याकडे होते तसेच आमचं लक्ष हे उद्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीकडे आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. जागा वाटपाची चर्चा लवकरच होणार असून सध्या आमच्या हातात तीन महिने आहेत. आमचे संपूर्ण लक्ष हे आगामी निवडणुकीकडे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *