Pune News: भुशी डॅम दुर्घटना, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, जिल्ह्यातील धोकादायक पर्यटन स्थळे बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जुलै ।। पुणे जिल्ह्यातील संभाव्य आपत्तीप्रवण क्षेत्र, डोंगरकडे, धबधब्यांसह प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येणार नाही, अशी पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करावीत;तसेच सायंकाळी सहानंतर अभयारण्यांमध्ये पर्यटकांना प्रवेश देऊ नये . 

पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर भविष्यात कोणताही अपघात घडणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. पर्यटन विभाग, वन विभाग, जलसपंदा विभाग, पर्यटन विकास महामंडळासह स्थानिक प्रशानालाला पर्यटन व्यवस्थपानाच्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

ताम्हिणी पाठोपाठ भुशी धरणात एक कुटुंब पाण्यात वाहून गेल्याची घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पावसाळ्यात पर्यटनस्थळी विविध कारणांमुळे अपघात होतात. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनीच पर्यटकांना आवरावे, अशी विनंती पर्यटनक्षेत्रातील अभ्यासकांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ आयोजित ‘राऊंड टेबल’मध्ये केली होती. त्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकाऱ्यांनीच पर्यटनस्थळांबाबत परिपत्रक काढले आहे. वाहतूक प्रशासन, पोलिसांनाही यात सूचना दिल्या आहेत. याबाबतपुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा अभ्यास करून आपत्कालीन आराखडा तयार करण्याचा आदेशही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
– पश्चिम घाट जंगलाच्या भागातील टपरीधारकांची अतिक्रमणे हटवावीत.
– वन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील असुरक्षित ठिकाणे पर्यटनासाठी बंद करावीत.
– पर्यटनासाठी सुरू ठेवण्यात येणाऱ्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सूचना फलक लावावेत.
– पर्यटनाची वेळ निश्चित करून सूर्यास्तानंतर पर्यटक तेथे थांबणार नाहीत याची दक्षता घ्यावी, नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध गरज भासल्यास खटले दाखल करावेत

स्वयंसेवकांची यादी करा
विविध भागांत पट्टीचे पोहोणारे, आपदा मित्र, सर्पमित्र, स्वयंसेवक; तसेच आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य करण्यासाठी मदत करणाऱ्यांची यादी पोलिस, जलसपंदा तसेच वन विभागाने तयार करावी. त्यांची बैठक घेऊन त्यांना मदत कार्य करण्यासाठी विनंती करावी. त्याकरिता प्रशिक्षण, शिबिरे आयोजित करा. वन विभागाने कोणत्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत त्याची माहिती उपलब्ध करावी. त्या ठिकाणी गरजेनुसार, प्रशिक्षित स्वयंसेवकांच्या मदतीनेच पर्यटकांना आत प्रवेश द्यावा, अशीही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.

पुणे जिल्ह्यातील जिल्ह्यातील गडकिल्ले, धरण, तलाव, धबधबे आणि घाट यासारख्या पर्यटनस्थळी होणारी गर्दी, गेल्या काही दिवसांत झालेल्या अपघातांचे गांभीर्य लक्षात घेऊन पर्यटकांच्या सुक्षेसासाठी आम्ही कठोर निर्णय घेतले आहे. या संदर्भात संबंधित विभागांना व्यवस्थापनाच्या सूचना दिल्या असून डोंगरकडे, दऱ्या, धबधबे असे आपत्तीप्रवण क्षेत्र पर्यटनासाठी तातडीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *