Electricity Theft : …मराठवाड्यामध्ये वर्षभरात ३२ कोटी रुपयांची वीजचोरी उघड !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 3 जुलै ।। महावितरणने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत वर्षभर राबविलेल्या मोहिमेत ४,६९८ वीजमीटरची तपासणी केली. त्यातील ३,७०४ मीटरमध्ये वीजचोरी झाल्याचे आढळून आले. त्यामुळे ४,१७,२१,३४४ युनिटच्या वीजचोरीप्रकरणी ३१ कोटी ९७ लाख ११ हजार रुपयांच्या अनुमानित वीजबिल दंडाच्या रकमेची आकारणी करण्यात आली. त्यापैकी २८ कोटी ७९ लाख ४४ हजार रुपये वसूल करण्यात आले.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षात दक्षता व सुरक्षा अंमलबजावणी विभागामार्फत वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबविली.

त्यात विद्युत कायदा २००३ नुसार कलम १२६ अंतर्गत शेजाऱ्यांकडून अनधिकृत वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुसऱ्या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे याचा समावेश होतो;

तसेच कलम १३५ मध्ये मीटरची छेडछाड करणे, आकडा टाकून विजेचा वापर करणे, सर्व्हिस वायर टॅप करणे व कलम १३८ मध्ये महावितरणचे मीटर, वायरसह इतर वस्तू चोरी करणे आदी बाबींचा समावेश होतो.

वीजचोरी पथक – ग्राहक – वीजचोरीची रक्कम
संभाजीनगर (शहर) -७४४ -६६०.०६

संभाजीनगर (ग्रामीण) -३४९- ३२५.३६

जालना -४४० -४३८.९७

संभाजीनगर परिमंडल -१,५३३ -१४२४.३९

बीड -२७९ -२७८.५४

धाराशिव -२५१ -३०१.८४

लातूर -३६८- ३४५.५८

लातूर परिमंडल- ८९८ -९२५.९६

नांदेड -३१३ -२०३.९९

हिंगोली -२७१- २०४.०२

परभणी -६८९ -४३८.७५

नांदेड परिमंडल -१,२७३ -८४६.७६

मराठवाडा एकूण -३,७०४ -३,१९७.११

वीजचोरी पकडण्याची मोहीम यापुढेही चालू राहणार आहे. अनधिकृतपणे विजेचा वापर करताना आढळून आल्यास विद्युत कायद्यानुसार कडक कारवाई करण्याबरोबरच आगामी काळात वीजचोरांविरोधात मोठ्या प्रमाणात वीजचोरी शोधमोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

– राहुल गुप्ता, सहव्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक कार्यालय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *