Monsoon Tips : पावसाळ्यात ओले शूज कसं सुकवाल? फॉलो करा टिप्स

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३ जुलै ।। पावसाळ्यात अनेक समस्येंना सामोरं जावं लागतं. त्यामध्ये विशेष करुन ओले कपडे अन् ओले शूज. पावसाळ्यात या दोन गोष्टी सुकायला बराच कालावधी लागतो. ओल्या शूजमुळे अनेकांची चिडचिड होताना दिसते. ओल्या शूजमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. पायांना इनफेक्शन होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं शूज कोरडं ठरण अधिक महत्त्वाच असतं. तर आपण आज जाणून घेऊयात पावसाळ्यात ओले शूज पटकन कोरडे कसे करायचं?(monsoon tips how to dry wet shoes quickly )

पेपरने कोरडे करा शूज
तुमचे ओले शूज पेपरने पुसण्याअगोदर स्वच्छ पाण्यानी धुवा. त्यानंतर पेपरचा गोळा तयार करा आणि शूजआत मध्ये ठेवा. अस केल्याने पेपर शूजमधील पाणी शोषून घेईल आणि शूज कोरडे पडतील.

ओले शूज कोरडे करण्यासाठी तुम्ही वृत्तपत्रांसह टिश्यूचादेखील वापर करु शकता.

फॅनखाली शूज सुकवा
ओले शूज सुकवण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे फॅन. फॅनखाली शूज सुकवण्यासाठी शूजचे लेस आणि इनसोल काढा. त्यानंतर शूज फॅनखाली ठेवा. तुम्हाला जर शूज लवकर सुकवायचे असेल तर टेबल फॅनचा वापर करा.

हेअर ड्रायर
तुम्ही तुमचे ओले शूज हेअर ड्रायरनेदेखील सुकवू शकता. शूजच्या आतील भागात हेअर ड्रायर फिरवा जेणेकरुन तुमचे शूज लवकर सुकतील. पण हेअर ड्रायर फिरवताना काळजी घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *