महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुलै ।। लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्ये मोठी घोषणा केली आहे. एका कुटुंबातील दोन महिलांना आता योजनेचा लाभ घेता येणार असल्याचं फडणवीस म्हणाले. सेतू केंद्राला योजनेच्या नोंदणीसाठी प्रति अर्ज ५० रुपये राज्यसरकार देणार, अधिकचे पैसे घेतले तर सेतू केंद्र रद्द करणार अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे. केशरी, पिवळं रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथिल करण्यात आली आहे. एजंटच्या माध्यमातून नोंदणी करु नका असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे.