Gold Price Fall : सोन्याचा भाव घसरला अन् चांदी महागली; वाचा मुंबई आणि पुण्यातील आजच्या किंमती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुलै ।। सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याचं दिसत आहे. आज देखील गूडरिटर्न्सवर आलेल्या आकडेवारीनुसार, सकाळी ९ वाजता सोन्याच्या किंमती कमी झाल्यात. तर चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे आज महाराष्ट्रासह विविध शहरांमधील सोने आणि चांदीच्या किंमती काय आहेत? त्याची माहिती जाणून घेऊ.

२२ कॅरेट सोन्याच्या किंमती
आज २२ कॅरेट सोन्याच्या किंमतीत १०० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे १०० ग्राम सोन्याचा भाव ६,६४,९०० रुपये आहे. तर १० ग्राम सोन्याची किंमत ६६,४९० रुपये इतकी आहे. तसेच ८ ग्राम सोन्याची किंमत ५३,१९२ रुपये इतकी आहे. त्यासह १ ग्राम सोन्याची किंमत ६,६४९ रुपये इतकी आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव
२४ कॅरेट सोन्याचा भाव सुद्धा कमी झाला आहे. १०० ग्राम सोन्याची किंमत आज ७,२५,२०० रुपये इतकी आहे. तर १० ग्राम सोन्याची किंमत ७२,५२० रुपये आहे. तसेच ८ ग्राम सोन्याची किंमत ५८,०१६ रुपये आहे आणि १ ग्राम सोन्याचा भाव ७,२५२ रुपये आहे.

१८ कॅरेटचा भाव काय?
१८ कॅरेट सोन्याची किंमत सुद्धा १०० रुपयांनी घसरून १०० ग्राम सोनं ५,४४,००० रुपयांना विकलं जात आहे. १० ग्राम सोनं ५४,४०० रुपये. ८ ग्राम सोनं ४३,५२० रुपये आणि १ ग्राम सोनं ५,४४० रुपये इतकी किंमत आहे.

पुण्यातील आणि मुंबईतील १ ग्राम सोन्याचा भाव

मुंबई आणि पुण्यात दोन्ही शहरांमधील भाव नेहमी सारखाच असतो. त्यामुळे आज या शहरांमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ६,६३४ रुपये, २४ कॅरेट सोनं ७,२३७ रुपये आणि १८ कॅरेट सोनं ५,४२८ रुपये इतकी आहे.

चांदीचा वाढलेला भाव
चांदीच्या दरांमध्ये आज १०० रुपयांची वाढ झालीये. त्यामुळे १ किलो चांदीचा भाव ९१,६०० रुपये इतका आहे. तर मुंबईत ९१,६०० रुपये प्रति किलो, पुण्यात ९१,६०० रुपये प्रति किलो, चेन्नईत ९१,६०० रुपये प्रति किलो, पटनामध्ये ९१,६०० रुपये प्रति किलो, कोलकत्तामध्ये ९१,६०० रुपये प्रति किलो, मेरठमध्ये ९१,६०० रुपये प्रति किलो आणि नाशकात तसेच महाराष्ट्रातील अन्य शहरांत सुद्धा चांदी ९१,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *