महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ जुलै ।। आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि मूल्यांकन वर्ष २०२४-२५ साठी ITR (आयकर रिटर्न) दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२४ आहे. प्राप्तिकर विभागाने याआधीच ऑनलाईन ITR फॉर्म्स जारी केले आहेत त्यामुळे करदात्यांना शेवटची तारीख लक्षात घेऊन आयटीआर फाईल करावा. ITR फाईल करण्यासाठी CA किंवा थर्ड पार्टी वेबसाइटची मदत घेतली जाऊ शकते पण यासाठी करदात्यांना निर्धारित शुल्क भरावे लागेल. आयकर विभागाने आयटीआरच्या ई-फायलिंगसाठी एक स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे, जे पूर्णपणे विनामूल्य आहे.
अर्थसंकल्प २०२३ सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कर प्रणालीअंतर्गत करदात्यांना दिलासा दिला मात्र, जुन्या कर प्रणालीत कोणतेही नवीन बदल केले नाही. ऑनलाईन ITR करणे गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, तसेच स्वतः आयटीआर दाखल करत असल्यास काही चुका होण्याचीही शक्यता असते त्यामुळे बहुतेक लोक चार्टर्ड अकाउंटंटची मदत घेतात. तुम्हालाही ITR स्वतःहून भरायचा असेल तर कोणालाही पैसे न देता अगदी मोफत तुमचे काम होऊ शकते. आयकर विभागाद्वारे नोंदणीकृत काही खाजगी संस्था आहेत ज्या त्यांच्या वेबसाइटद्वारे ई-फायलिंग प्रक्रिया उपलब्ध करून देतात, यापैकी काही खाजगी वेबसाइट काही फंक्शन्ससाठी शुल्क आकारू शकतात, तरीही काही वेबसाइट्स विनामूल्य असल्याचा दावा करतात.
ClearTax
ClearTax करदात्यांना आयकर वेबसाइटवर लॉग इन न करता थेट ITR दाखल करण्याची संधी मिळवून देते. ClearTax प्लॅटफॉर्म उत्पन्नाच्या स्रोताच्या आधारावर दाखल करावयाचा ITR आपोआप ओळखतो. ClearTax वरून ऑनलाईन ITR दाखल करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे
फॉर्म 16 अपलोड करा.
ClearTax आपोआप ITR जनरेट करते.
कर सारांश सत्यापित करा.
पोचपावती क्रमांक मिळविण्यासाठी कर रिटर्न ई-फाइल करा.
नेट बँकिंगद्वारे टॅक्स रिटर्नची ई-पडताळणी करा.
MyITreturn
MyIReturn देखील आयकर विभागाकडे नोंदणीकृत आणखी एक अधिकृत ई-रिटर्न वेबसाइट आहे जे विनामूल्य आयटीआर भरणा उपलब्ध करून देण्याचा दावा करते. या वेबसाइटवरून ITR दाखल करण्यासाठी वेबसाइटवर मूलभूत प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील जे पगार, घर, गुंतवणूक आणि इतर बऱ्याच गोष्टींशी संबंधित असतील. उत्तरांवर आधारित प्रणाली ITR साठी आकडे काढते.
EZTax
EasyTax स्वयं-सेवा कर ई-फायलिंग पोर्टल असून वापरकर्त्यांना खाते तयार करून आणि इतर आवश्यक माहितीसह दस्तऐवज अपलोड करून काही मिनिटांत रिटर्न फाइल करून देते. करदात्यांना पेमेंट करण्यासाठी आणि कर भरण्यासाठी व्यावसायिक नियुक्त करण्याचा पर्याय देखील या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
क्विको
Quiko देखील १००% मोफत आयटीआर फायलिंग वेबसाइट असल्याचा दावा करते. पगारदार आणि अनुमानित कर आकारणी योजना निवडलेल्या करदात्यांसाठी ही वेबसाइट विनामूल्य आहे.
Tax2win
Tax2Win आणखी एक ई-फायलिंग पोर्टल करदात्यांना विनामूल्य ITR फाइल करण्याची परवानगी देते. वापरकर्त्यांना लॉग इन करून किंवा नवीन खाते तयार करावे लागेल आणि नंतर उत्पन्नाचे स्रोत निवडावे लागेल. आता आवश्यक तपशील प्रविष्ट करावा किंवा फॉर्म-16 अपलोड करून जुन्या आणि नवीन कर प्रणालीपैकी एकाची निवड करूमी आयकर ई-फाइल केला जाऊ शकतो.