Mumbai Rains Update: मुंबईत पावसात अडकला, या क्रमांकावर मदतीसाठी साधा संपर्क

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ जुलै ।। मुंबईकरांना पुन्हा एकदा पावसाचा कहरचा फटका बसला आहे. सहा तासांत मुंबईतील ३३० मिमी पाऊस झाल्यामुळे देशाची आर्थिक राजधानी ठप्प झाली. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा मुंबईकरांच्या सेवेसाठी सुसज्ज आहे. आपत्कालीन नियंत्रण कक्षासह मुंबईत आपत्कालीन कर्मचारी व अधिकारी वर्ग विविध ठिकाणी उपस्थित आहे. तसेच महानगरपालिकेचे सर्व उपआयुक्त, सहायक आयुक्त आणि सर्व यंत्रणा विविध ठिकाणी कार्यरत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्व घडामोडींवर लक्ष ठेवले आहे. मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या १० टक्के पाऊस आहे. त्यामुळे मुंबई तुंबली आहे.

मदतीसाठी या क्रमांकावर संपर्क साधा
नागरिकांनी कोणतेही अफवांवर विश्वास ठेऊ नये. मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे. आपतकालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मी दिले आहेत. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन मी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *