दापोडीत पोलिसांना धडक देणाऱ्या कारचालकाचं नाव उघड, भरधाव स्विफ्टच्या धडकेत समाधान कोळींचा मृत्यू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 8 जुलै ।। पुण्यात जुन्या पुणे-मुंबई महामार्गाजवळ झालेल्या हिट अँड रनच्या (Pune Hit And Run) प्रकरणानं सगळीकडे खळबळ माजली आहे.एका वाहनानं दोन पोलिसांना चिरडलं. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. दापोडीत पोलिसांना धडक देणाऱ्या कारचालकाचं नाव उघड झाले आहे. दापोडीतील अपघातग्रस्त कारचालकाचं नाव सिद्धार्थ केंगार आहे. दापोडीत हिट अँड रनमध्ये हवालदार समाधान कोळींचा मृत्यू झाला आहे.

दापोडीत दोन पोलिस कॉन्स्टेबलच्या दुचाकीला धडक देऊन पळालेली गाडी स्वीफ्ट डिझायर कार असून पोलिसांनी कार चालकाला पुण्यातून कारसह ताब्यात घेतलंय. हा अपघात जेव्हा घडला तेव्हा त्याच भागातून पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार जाताना सीसीटीव्हीमधे दिसली होती. जी मुंबईतून अपघातग्रस्त होऊन आली होती. त्यामुळे त्या इनोव्हा कारने अपघात घडला असावा असा अंदाज पोलिसांनी आधी व्यक्त केला होता. मात्र पुढे तपासात स्विफ्ट कारने धडक दिल्याने पोलिस कॉन्स्टेबल समाधान कोळींचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. सिद्धार्थ केंगार (24 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी अटकेत असून वाहन पण ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याला ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. आरोपीचे ब्लड घेण्यात आले असून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *