TRAI Chakshu : सायबर गुन्हेगारी अन् फ्रॉड कॉल्सना रोखण्यासाठी येतोय चक्षु; TRAI ने लाँच केले पोर्टल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ जुलै ।। Cyber Fraud : डिजिटल युगात वाढत्या सायबर फसवणुकीमुळे आज प्रत्येकजण त्रासला आहे.आता ‘चक्षु’ तुमच्या मदतीला येतोय. भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरण (TRAI) ने नुकतेच ‘चक्षु’ (Chakshu) नावाचे एक नवीन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे तुम्ही संशयास्पद वाटणारे फोन नंबर, एसएमएस किंवा अगदी WhatsApp मेसेजही रिपोर्ट करू शकता. ‘चक्षु’ म्हणजे हिंदीमध्ये ‘डोळा’ असा अर्थ होतो.

बँकेचे बनावटी कॉल, क्रेडिट कार्डबाबत फसवणूक माहिती, बनावटी ग्राहक सेवा क्रमांक, ऑनलाईन नोकरीच्या फसव्या आमिषांपासून ते गॅस कनेक्शनशी संबंधित फसवणूक यासारख्या विविध फसवणुकींची माहिती तुम्ही चक्षुवर देऊ शकता. तुम्ही दिलेली माहिती ट्राई तपासेल आणि फसवणूक सिद्ध झाल्यास संबंधित क्रमांकावर कारवाई करेल.

चक्षुवर रिपोर्ट दाखल करण्यासाठी काय करावे लागेल?
कोणत्या प्रकारच्या फसवणुकीची माहिती द्यायची आहे ते निवडा (उदा. केवायसी, बनावट ओळख, बनावटी ग्राहक सेवा क्रमांक वगैरे)

फसवणूक लक्षित करणारे स्क्रीनशॉट किंवा इमेजेस असतील तर त्या जोडा (अति आवश्यक नाही)

फसवणूक झालेल्या तारीख-वेळेची माहिती द्या आणि थोडक्यात घडलेल्या प्रकाराची माहिती लिहा.

तुमची वैयक्तिक माहिती जसे नाव आणि फोन नंबर द्या (फसवणूक रोखण्यासाठी)

दिलेल्या फोन नंबरवर येणारा OTP टाकून रिपोर्ट सबमिट करा.

अंतराळवीर
चक्षु फसवणूक रोखण्यासाठी आहे. आर्थिक सायबर गुन्हेगारी ऑनलाईन फसवणूक ज्यात तुमच्या पैशावर परिणाम होतो असे झाल्यास 1930 वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर रिपोर्ट करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *