महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.११ जुलै ।। मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आणि वाहन चालक यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महामार्गावर आजपासून तीन दिवस दररोज चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्ग अवलंबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई गोवा महामार्गावर आजपासून तीन दिवस चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कोलाडजवळ पुई इथं म्हैसदारा नदीवर नवीन पुलाच्या कामासाठी गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 असे दररोज 4 तास हे काम चालणार आहे. यासाठीच महामार्गावर बंद असणार आहे.
याकाळात महामार्गावरील सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. कोकणात येणारी वाहने वाकण पाली माणगाव मार्गे तर मुंबईकडे जाणारी वाहतूक कोलाड रोहा भिसे खिंड मार्गे नागोठणे अशी वळवण्यात आली आहेत. प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईहून गोव्याकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग!
– वाकण फाटा ते भिसे खिंड-रोहा- कालाड मार्गे मार्गस्थ होता येईल.
– वाकण फाटा वरुन पाली-रवाळजे-कोलाड मार्गे निजामपुर-माणगांव मार्गे.
गोव्याहून मुंबईकडे जाणारे पर्यायी मार्ग!
कोलाड ते कालाड-रोहा-भिसे खिंड- वाकण फाटा मार्गे
कोलाड ते रवाळजे-पाली वरून वळवून वाकण- पाली- खोपोली राष्ट्रीय महामार्गे
कोलाड ते रवाळजे-पाली-वाकण फाटाकडे वळवून मुंबई गोवा महामार्गे