![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.११ जुलै ।। फसव्या आणि चुकीच्या पद्धतीने एलपीजी गॅस कनेक्शन घेतलेल्या लोकांची आता खैर नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बुधवारी सांगितले की बनवत एलपीजी गॅस कनेक्शन बंद करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्याद्वारे आधारद्वारे एलपीजी ग्राहकांचे ई-केवायसी पडताळणी केली जात आहे. आधारच्या मदतीने e-KYC (ऑनलाईन ग्राहक पडताळणी) ची प्रक्रिया बनावट ग्राहकांवर आळा घालण्यासाठी केली जाते ज्यांच्या नावाने बुक एलपीजी व्यावसायिक आस्थापनांमध्ये वापरला जातो.

एलपीजी गॅस सिलिंडरचा भाव काय
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर ८०३ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे तर हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर १,६४६ रुपयांना मिळतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पुरी यांनी म्हटले की, “पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्या एलपीजी ग्राहकांसाठी आधारद्वारे ई-केवायसी पडताळणी करत आहेत जेणेकरून अशा ग्राहकांवर आळा बसेल ज्यांच्या नावाने काही गॅस वितरक अनेकदा व्यावसायिक सिलिंडर बुक करतात. ही प्रक्रिया आठ महिन्यांहून अधिक काळ सुरू आहे.”
Oil Marketing Companies are undertaking eKYC aadhar authentication for LPG customers to remove bogus customers against whose name commercial cylinders are often booked by certain gas distributors. This process is in place for more than 8 months now.
In this process, the LPG… https://t.co/D8ApxHkjP5
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) July 9, 2024
आधार क्रमांकावरून LPG ई-केवायसी काय करायचे
या प्रश्नाच्या उत्तरात पुरी म्हणाले की, गॅस सिलिंडरचा पुरवठा करणारा कर्मचारी ग्राहकाच्या ओळखीशी संबंधित तपशिलाची पडताळणी करतो. कर्मचारी मोबाईल फोनवर ॲपद्वारे ग्राहकांच्या आधारची पडताळणी करतात पण, गॅस ग्राहक सोयीनुसार वितरक शोरूमशी संपर्क साधू शकतात. याशिवाय ग्राहक गॅस वितरक कंपनीच्या ॲपद्वारेही ग्राहकांचे ई-केवायसी पूर्ण करू शकतात. मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्षाच्या आकडेवारीनुसार, देशभरात ३२.६४ कोटी सक्रिय घरगुती एलपीजी वापरकर्ते आहेत.
एलपीजी ग्राहकांना सरकारचा दिलासा
दुसरीकडे, तेल कंपन्यांकडून सुरू केवायसी प्रक्रियेमुळे त्रासलेल्या एलपीजी ग्राहकांसाठी पुरी यांनी आणखी एक दिलासा दिलासा ज्यामुळे कोट्यवधी एलपीजी गॅस सिलिंडर ग्राहकांची मोठी डोकेदुखी दूर झाली असेल. पुरी यांनी स्पष्ट केले की एलपीजी ग्राहकांची eKYC प्रक्रियेसाठी कोणतीही निश्चित वेळ मर्यादा नसून सिलिंडर योग्य ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.![]()