TATA-BSNL Deal: टाटांमुळे जिओ, एअरटेलचे टेन्शन वाढणार, BSNL यूजर्संची लॉटरी लागणार? एका निर्णयाचा मोठा फटका बसणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जुलै ।। खाजगी टेलिकॉम कंपन्या जिओ आणि एअरटेलने अलीकडेच टॅरिफ (मोबाईल रिचार्ज) वाढ केल्यानंतर सर्वसामान्य लोकं बीएसएनएलकडे वळत आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि बीएसएनएलमधील करारामुळे खासगी टेलिकॉम कंपन्यांचे टेन्शन वाढले असून बीएसएनएल खेड्यापाड्यात जलद इंटरनेट देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

एअरटेल आणि जिओच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ झाल्यानंतर लोक बीएसएनएलकडे वळू लागले असून एअरटेल आणि जिओ वापरकर्ते मोबाईल नंबर BSNL वर पोर्टही करत आहेत. या दरम्यान, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस आणि बीएसएनएल यांच्यात १५,००० कोटी रुपयांचा करार झाल्याचीही बातमी समोर आली असून टीसीएस आणि बीएसएनएल एकत्र भारतातील हजारो खेड्यांमध्ये 4G इंटरनेट सेवा सुरू करणार आहेत जेणेकरून आगामी काळात गावातील लोकांनाही जलद इंटरनेट सेवेचा लाभ मिळू शकेल.

जिओ-एअरटेलचे टेन्शन वाढणार
सध्याच्या काळात जिओ आणि एअरटेलचे 4G इंटरनेट सेवेवर वर्चस्व आहे, पण बीएसएनएल मजबूत झाल्यास या दोन्ही खासगी कंपन्यांचा तणाव वाढू शकतो. टाटा ग्रुप भारतातील चार क्षेत्रांमध्ये डेटा केंद्रे बांधत आहे, ज्यामुळे भारतातील 4G पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मदत होईल. तर बीएसएनएलने देशभरात ९,००० हून अधिक 4G नेटवर्क उभे केले आहेत जे एक लाखापर्यंत वाढवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. टाटा आणि बीएसएनएल यांच्यातील कराराने भारतातील 4G नेटवर्क सुलभ होईलच याशिवाय 5G नेटवर्कसाठी बेस तयार करण्यासही मदत होईल.

जिओ-एअरटेलची तारीफ वाढ
गेल्या महिन्यात जिओने जुलैपासून आपले रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ जाहीर केले होती तर त्यानंतर लगेच एअरटेल आणि Vi ने देखील तारीफ वाढमध्ये उडी घेतली. जिओ आणि एअरटेलच्या वाढलेल्या किमती ३ जुलैपासून तर Vi च्या वाढीव किंमती ४ जुलैपासून लागू झाल्या आहेत. जिओकडून टॅरिफमध्ये सर्वाधिक १२ ते २५ टक्के वाढ करण्यात आलाय असून एअरटेलने ११ ते २१ टक्क्यांनी आणि Vi ने १० ते २१ टक्क्यांनी मोबाईल रिचार्ज महाग केले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *